हिंगोली सेनगाव रोडवर केसापुर पाटीवर एक जण ठार एक जखमी
हिंगोली प्रतिनिधी
हिंगोली ते सेनगाव रोडवर केसापूर पार्टी जवळ आज सायंकाळी सहा वाजता ट्रॅक्टर पलटी होऊन एका जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याने त्यांना तात्काळ पोलिसांनी सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी भरती केले
सविस्तर माहिती अशी की
पानकनेरगाव येथील ट्रॅक्टर चालक मालक
कैलाश गायकवाड यांच्या
अंगावर ट्रॅक्टर पलटी होऊन गायकवाड जागीच ठार झाले तर एकाने ट्रॅक्टर पडली होताच उडी मारून जीव वाजविला
घटनास्थळी नरसी नामदेव पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरी यांनी तात्काळ पथक पाठवून पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी जखमींना तात्काळ दवाखान्यामध्ये पुढील उपचारासाठी हलविले आहे
मयताच्या अंगावर ट्रॅक्टर पंलटी होऊन जागीच दबला होता त्याला जेसीपी लावून ताबडतोब बाहेर काढले असेही ठाणेदार गिरी यांनी सांगितले
एका ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाल्याने केसापूर व पानकनेरगाव गावात हळहळ व्यक्त होते आहे
إرسال تعليق