कोरोणा पासुन सुरक्षेकरीता बाहेर बाजारात असतांना फिरतांना तोंडावर मास्क असने अत्यंत आवश्यक आहे. याबाबत जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सतत नागरीकांना सुचना देत आहेत. तरी काही जण याकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करीत आहेत. परंतु नागरीकांनी कोरोणा पासुन सुरक्षेकरीता असलेले सर्व नियम पाळावे त्याची जाणीव व्हावी म्हणुन बासंबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश मलपिलु पो.हवा. पोले, गव्हाने, राठोड, गुंजकर यांनी पुढे येवुन ग्रामपंचायत प्रशासन ग्रामसेवक जी.एस.कीलचे व त्यांच्या स्टाफसह मिळुन सिरसम येथील बाजार परीसरात मास्क न वापरता फिरणारे व्यक्ती व मास्क न वापरता व्यवहार करणारे दुकाणदारांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीची मोहीम राबवुन अनेकां विरुध्द कार्यवाही करुन दंड वसुल केला. परीणाम स्वरुप बाजारातील सर्व व्यापारी व नागरीक मास्क घालुनच वावरतांना दिसत आहेत.
إرسال تعليق