जांभरून आध रास्तभाव दुकानदार यांच्या मनमानी कारभार लाभार्थी वैतागले

रास्तभाव दुकानदाराच्या मनमानी कारभाराला जांभरून आंध येथील ग्रामस्थ वैतागले

बिबीशन जोशिले सुधाकर मल्होत्रा

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिले निवेदन ,अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप

हिंगोली - तालुक्यातील जांभरून आंध येथील रास्तभाव दुकान दाराने मनमानी कारभार करून मागील दोन महिन्यापासून राशन देत नाही, अधिकारी यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करून त्या दुकांदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे गुरुवारी केली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे गुरुवारी जांभरून आंध येथील ग्रामस्थांनी रास्त भाव दुकान दाराच्या मनमानी कारभारविरुद्ध निवेदन दिले. यात नमूद केले की, या गावात आदिवासी लोकांची संख्या अधिक असताना हा रास्त भाव दुकानदार लाभार्थ्यांना कमी प्रमाणात धान्य देऊन अधिक दराने पैसे वसूल करीत आहे, धान्य वितरण केल्याची पावती मागितल्यास धमकी देत आहे, बोगस यादी तयार करून अधिकचा माल उचलून तो लाभार्थ्यांना न देता परस्पर काळ्या बाजारात विक्री करून अधिकाऱ्यांना पाठीशी घालून हा प्रकार करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

तसेच रास्त भाव दुकानदार हा साठ टक्के धान्य कमी देतो, अंत्योदय लाभार्थ्यांना ३५ किलो धान्य ऐवजी कमी राशन देतो, तसेच जवळच्या नातलगाची नावे यादीत समाविष्ट करून त्यांना राशन देत आहे. गावातील लाभार्थ्यांना माल न देता शेजारील गावातील लोकांना सहाशे रुपये कट्ट्या प्रमाणे माल विकत आहे. याकडे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असून असे प्रकार जिल्ह्यात वारंवार घडत असून पुरवठा विभागाची बदनामी होत आहे. उचल केलेला माल हा थेट काळ्या बाजारात जात आहे, असे असतानाही याकडे संबंधित विभागाचे का लक्ष नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Post a Comment

أحدث أقدم