केंद्र शासनाने जीएसटी करप्रणालीत चार वर्षात सुमारे 1000 नोटिफिकेशन व सुधारणां मुळे करप्रणाली अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची ठरत आहे अनेक छोट्या मोठ्या उद्योगांना व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे.जीएसटी कायद्यातील जाचक अटी आणि तरतुदी रद्द करून कायद्याचे सरळीकरण करण्यात यावे या मागणी करता कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ह्या भारतातील किरकोळ व छोट्या व्यापाऱ्यांच्या एकमेव संघटनेने भारत व्यापार बंद पुकारला आहे त्यात हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ , हिंगोली जिल्हा कर सल्लागार संघटना व व्यापाऱ्यांच्या ईतर सांघटना सहभागी असून जिल्हाधिकारी ह्यांचे मार्फत निवेदनान मा. पंतप्रधान भारत सरकार ह्यांना पाठविण्यात आली आहे.
निवेदनात जिवनावश्यक व खाद्यान्न वस्तूवर जीएसटी नसावा , रिटर्न जर चुकीचे असेल तर ते दुरुस्त करण्याची तरतूद असावी , IGST ऐवजी CGST आणि SGST किंवा CGST आणि SGST ऐवजी IGST भरला गेला असेल तर करदात्याला तो समायोजित करण्याची तरतूद असावी, विविध प्रकारचे लेजर (CGST, IGST, SGST व्याज दंड ) ठेवण्या पेक्षा जीएसटीचे एकच लेजर असावे , दोन महिने रिटर्न भारले नसले तर सदर व्यवसायिकाचे ई- वे बिल करता येत नाही त्यामुळे पुरवठादारास विनाकारण त्रास होतो व वसुली आणि पुरवठा संबंधीच्या अडचणी निर्माण होतात
नविनच आलेल्या आपल्या ई - वे बिलाची वैधता 24 तासात १०० किलोमीटर ऐवजी २०० किलोमीटर करण्यात आली आहे त्यामुळे अनावश्यक अडचणी निर्माण होणार आहेत सदर बाबतीत सुट्या, बंद , एकाच वाहनातून अनेक जागी खाली होणारा माल या गोष्टींचा विचार करण्यात आलेला नाही, जिएसटी चे अधिकारी कोणतीही पूर्व सूचना अथवा खुलासा करण्याची संधी न देता जीएसटी नोंदणी रद्द करण्याची तरतूद अन्यायकारक आहे , आधार कार्ड वर आधारित नवीन नोंदणीसाठी तीन दिवस तर ईतरांसाठी सात दिवस अशी कालमर्यादा बदलून ती सात दिवस आणि तीस दिवस करण्यात आलेली आहे सदरचा बदल अनावश्यक आहे, जर पुरवठादाराने जीएसटी भरला नाही तर त्याची जबाबदारी खरेदी दारावर येत आहे ती तरतूद बदलावी, जिएसटी सोबत फूड सेफ्टी कायदा तसेच आयकर कायदा यातील काही तरतुदी प्रामाणिक व्यवसायिकांना अन्यायकारक आहेत त्यात बदल होणे गरजेचे आहे.
वर नमूद केलेल्या व अन्य अन्यायकारक व किचकट तरतुदीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काॕनफेडरेशन आॕफ आॕल ईंडीया ट्रेडर्स ने एक दिवसाचा दिनांक 26 फेब्रूवारी 2021 भारत व्यापार बंद आयोजित करण्यात आला आहे. बंद मध्ये हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ सहभागी असून केंद्र शासनाने तातडीने या बंद ची दखल घ्यावी अशी विनंती निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्वच तालुका व ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनी उस्फूर्त पणे बंद मध्ये सहभागी होवून बंद यशस्वी केल्या बद्दल हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाने सर्व व्यापाऱ्यांचे आभार मानले आहेत
निवेदनावर नंदकिशोर तोष्णीवाल, अनिल नैनवाणी, कैलाश काबरा, प्रशांत सोनी, संजय देवडा, सुमीत चौधरी, जगजीतराज खुराना
पंकज वर्मा, दयाल यादव, सागर दुबे, आनंद अग्रवाल, रसिंग पुरोहीत, गोविंद झंवर , नरेश देशमुख, सुमीत चांडक , महेश मोकाटे, सचिन लखोटीया, पंकज सोनी, मधूर भंसाळी, रजनीष पुरोहित, सर्वेश काबरा, ओम नैनवाणी मयुर कयाल , अभिजीत डूब्बेवार, पंकज, दुबे प्रशांत मुंदडा , सुरेंद्र सोनी, निरज बडजाते, पवन राठी, कार्तीक चांडक, पवन मुंदडा, श्याम खंडेलवाल, कृष्णा अग्रवाल, रमन काबरा, , ललीत चंदनानी, आशीष पोरवाल , अनुप अग्रवाल, , शेख शहेबाज , नजीर पठाण, नरेश नैनवाणी, राजकुमार मुंदडा, महेश शहाने, एस . के. मझर, प्रणव पांडे, अशिष खंदारे व बहूसंख्य व्यापारी पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
हिंगोली जिल्ह्यातील सर्वच तालुका व ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनी उस्फूर्त पणे बंद मध्ये सहभागी होवून बंद यशस्वी केल्या बद्दल हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाने सर्व व्यापाऱ्यांचे आभार मानले आहेत
إرسال تعليق