मोकातील आरोपी हिंगोली शहर पोलिसांनी नेपाळ बॉर्डर वरून केली अटक

मोक्कातील फरार आरोपीना नेपाळ बॉर्डर येथून केले अटक 

शहर पोलीस पथकाची कारवाई

बिभीषण जोशीले /सुधाकर म्हलोत्रा
--------------------------------------------
हिंगोली -  मोक्कातील आरोपीवर  विविध कलमाखाली  शहर पोलीस ठाण्या अंतर्गत विविध गुन्हे दाखल झाले होते. मात्र हे आरोपी फरार होते .अखेर या आरोपीना उत्तर प्रदेशातील नेपाळ बॉर्डर येथून शहर पोलिसांच्या पथकाने सोमवारी अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोक्कातील फरार आरोपीवर शस्त्र अधिनियम १३५,मपोका व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अशा विविध कलमान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. मात्र सत्र न्यायालय यांना सदर गुन्ह्यातील आरोपीचा कलम ३०७ भादवी मध्ये दिलेला जामीन रद्द करून ता.१५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोलीसा समोर हजर होण्याचे आदेश दिले असताना आरोपीनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून हजर न होता फरार होते.फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथकाची स्थापना करण्यात आली होती. दरम्यान, यातील फरार आरोपी लक्ष्मण विलास नांगरे भागवत बाबाराव बांगर हे उत्तरप्रदेशातील एका गावात संशयास्पद रित्या फिरत  असल्याचे पोलिसांना मिळून आल्याने उत्तर प्रदेश पोलिसांनी नाव, गाव अशी विचारणा केली असता आरोपीने हिंगोली येथील रहिवासी असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेत या प्रकारची हिंगोली पोलिसांना माहिती दिली,त्यावरून हिंगोली पथकाने आरोपीना ताब्यात घेण्यासाठी नेपाळ बोर्डारकडे पथक रवाना केले.

सदर पथकाने १३०० किलोमीटर चा प्रवास करीत  उत्तरप्रदेश राज्यातील महाराजगंज जिल्ह्यातील पुरंदरपूर पोलीस ठाण्यातून आरोपीला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर करून तीन दिवसाचा पीसीआर घेतला त्यानंतर आरोपीला हिंगोली येथे आणले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर ,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन केनेकर ,शेख मुजीब, असलम गारवे, दिलीप बांगर, या पथकाने तीन दिवसात २६०० किलो मीटरचा प्रवास करून आरोपीस अटक केली.

Post a Comment

أحدث أقدم