बसवर दगडफेक प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
सुधाकर म्हलोत्रा / बिभीषण जोशी
------------------------------------------
हिंगोली . - राज्य परिवहन मंडळाच्या बिलोली ते अकोला जाणाऱ्या बसवर साडे पाचच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दारू पिऊन समोरील काचावर दगड फेकून पंधरा हजार रुपयांचे नुकसान केल्या प्रकरणी त्यावर गुरुवारी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
नांदेड जिल्ह्याची बिलोली ते अकोला बस क्रमांक एम एच१४ बीटी ३०५० बिलोली आगराची बस गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास हिंगोली येथील बसस्थानक कडे जात असताना तापडिया इस्टेट गेट समोर आली असताना समोरून एक अनोळखी व्यक्तीने दारूच्या नशेत काहीही कारण नसताना बसवर दगड फेकून समोरील काचेचे नुकसान केले, यात सुमारे पंधरा हजाराचे नुकसान झाल्याचे चालकाने सांगितले.त्या व्यक्तीस बस मध्ये बसवून थेट चालकाने गाडी पोलीस ठाण्यात आणून लावली. पोलिसांनी त्यास नाव गाव विचारले असता त्याने गौतम गोविंदा मोरे राहणार वाशिम असे नाव सांगितले.सादर व्यक्तीने बसवर दगड मारून बसचे अंदाजे पंधरा हजार रुपयांचे नुकसान केल्या प्रकरणी चालक दत्तात्रय घुगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
إرسال تعليق