ग्रह मंत्री अनिल देशमुख यांना तात्काळ राजीनामा देण्यासाठी हिंगोलीत भाजपाचे आंदोलन

गृहमंत्र्यांनी  अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी हिंगोलीत भाजपा तर्फे आंदोलन

महाराष्ट्र 24 न्यूज

हिंगोली : गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी हिंगोली येथे भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलन केले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केला आहे.
 त्यामुळे आता विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या मागणी करीता राज्यभर आंदोलन केले जात आहे. आज 21 मार्च रोजी हिंगोली येथील गांधी चौक येथे भाजपाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आंदोलनात नगराध्यक्ष बाबाराव बांगर प्रशांत सोनी, उमेश नागरे, नगरसेवक गणेश बांगर, उमेश गुट्टे, महीला जिल्हाध्यक्षा यशोदा कोरडे, रजनी पाटील, संजय ढोके, शाम खंडेलवाल, बाबा घुगे, कृष्णा ढोके, बंडु कराळे, सचिन शिंदे, आशिष जैस्वाल आदी सहभागी झाले होते.

 जिल्ह्यात 144 कलम लागू असताना आंदोलन कसे केले हे मात्र  नागरिकांमध्ये    चांगलीच चर्चा रंगली होती

Post a Comment

أحدث أقدم