हिंगोली शहर पोलीस च्या वतीने रक्तदान शिबीर 105 नागरिकांना केले रक्तदान

हिंगोलीत १०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान , पोलीस विभागाचा पुढाकार

बिभीषण जोशीले / सुधाकर म्हलोत्रा
----------------------------------------^^
हिंगोली -  जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने आरोग्य विभागाच्या आवाहना नुसार गुरुवारी ( ता.८)शहर पोलीस विभाग  व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात १०५ पोलीस अधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.

येथील शहर पोलीस ठाण्यात आयोजित रक्तदान शिबिरात गुरुवारी १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवू लागल्याने कोविड गंभीर रुग्णांना अपुरा रक्तसाठा असल्याने गैर सोय होऊ लागली होती. त्यानुसार रक्तपेढीतील डॉ. स्वाती गुंडेवार यांच्यासह रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सामाजिक संघटनांना व पोलीस दलाला रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार  रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान या प्रमाणे गुरुवारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर ,अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस निरीक्षक सुहास कांबळे, मनोज पांडे ,यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून गरीब रुग्णासाठी व कोरोना बाधित रुग्णांना हा जमा झालेला रक्तसाठा वरदान ठरणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم