*मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोर अटकेत मात्र त्याचे दोन साथीदार फरार*
हिंगोली जिल्ह्यात चोरीचे प्रकार वाढले आहेत यामध्ये मोटरसायकल चोरीचे मोठी टोळी हिंगोली जिल्ह्यात सक्रिय झाल्याचे अनेक दिवसांपासून दिसून येत आहेत , तसेच पोलीस तसेच पोलीस विभागाच्या वतीने अनेक चोरांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे पोलीस विभागाच्या वतीने कठोर परिश्रम घेत चोरांना अटक करण्याचे काम चालू आहे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार सायकल प्रकरणात एक पथक तयार करण्यात आले होते ,के डी पोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी बोके, शंकर जाधव, सुनील अंभोरे, विठ्ठल कोळेकर ,संभाजी लकुळे, शंकर ठोंबरे, राजू ठाकुर ,ज्ञानेश्वर सावळे ,किशोर सावंत ,आकाश टापरे चालक शेख जावेद यांचे हे मोटर सायकल चोरांसाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते, या पथकाने परिश्रम घेत गोपनीय माहिती प्रमाणे मोटार सायकल चोरीतील आरोपी सचिन उर्फ राजू रामा खिल्लारे 26 वर्ष गडद गव्हाण तालुका जिंतूर जिल्हा परभणी याला अटक केली व त्यांचे दोन साथीदार यांनी मोटर सायकल चोरी करून बनावट आरसी बुक तयार करून लोकांची फसवणूक करत चोरीच्या मोटारसायकल गडद गव्हाण, दाभा, जोड,परळी ,टेंभुर्णी, दिग्रस, येथे विक्री केल्याची तपासात निष्पन्न झाले,चोराच्या ताब्यात हिंगोलीतील 2 मोटर सायकल, नांदेड येथील 2 ,परभणी येथील 1, वाशीम येथील 3,औरंगाबाद येथील 2 अकोला येथील 1, बुलढाणा येथील 1 तसेच अनेक जिल्ह्यातील एकूण 29 मोटरसायकल ताब्यात घेण्यात आल्या मोटार सायकलची किंमत अंदाजे 15, 6500 तसेच मोटार सायकल चोर त्यांचे साथीदार पांगरी येथील रहिवासी हरिदास टापरे, अरविंद हरिदास टापरे हे लोकांची फसवणूक करत होते, मोटरसायकलचे चेचीस नंबर खाडा तोड करत ,तसेच इंजिन नंबर बदलण्यात येत होते ,तसेच बनावट आरसी बुक तयार करुन व काही मोटरसायकलचे कागदपत्रे नंतर देतो असे खोटे सांगून विक्री करत होते, या प्रकरणातील आरोपी हरिदास टापरे, अरविंद टापरे हे अद्याप फरार आहेत ,या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर अनेक मोटरसायकली मिळण्याची शक्यता आहे तसेच या प्रकरणात पोलिसांच्या वतीने चांगली कामगिरी करण्यात येत आहे ,कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे ,तसेच पोलीस अधीक्षक यांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे ज्यांचे वाहने चोरीला गेलेली आहे,त्यांनी आपल्या वाहनाची ओळख पटवून पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण येथे संपर्क साधून मोटर सायकल घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बंदखडके ,पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस ना. धामणे हे करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा