कोरोनाचे संकट पाहता अंगणवाडीतील बालकांना घरपोच आहार वाटप

हिंगोली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील एक हजार ८९ अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले असल्याने आता अंगणवाडीतील तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना सोशल डिस्टिनसिंग पाळत मागील यावर्षी देखील घरपोच आहार वाटप करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, प्रसार होऊ नये यासाठी शासनाने अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांना सुट्या देण्यात आल्या. मात्र सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील बालकांसह गरोदर माता, स्तनदा माता याना यापूर्वीच घरपोच आहार दिला जात होता. परंतु एक वर्षे ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रातच गरम ताजा आहार देण्यात येत होता. आता अंगणवाडी केंद्राना सुट्टी असल्याने एक ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना घरपोच आहार देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एक हजार ८९ अंगणवाडी केंद्रात मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी एक ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना घरपोच आहार वाटप सुरु केला आहे.
पोषण आहार वाटप करताना दक्षता म्हणून अंगणवाडी सेविका, मदतनीस मास्क, सॅनिटायझर व हॅड ग्लोजचा वापर करीत काळजी घेत आहेत. तसेच सोशल डिस्टसिंगचे पालन करुन लाभार्थ्यांना आहार वाटप केला आहे. कोरोनाचा प्रसार किंवा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र शासनाने पुन्हा लॉकडाऊनचा कार्यकाळ एक मेपर्यन्त वाढविण्यात आल्याने भाजीपाला, किराणा व अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, बंद ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार आता अंगणवाड्या देखील बंद केल्यामुळे एक ते सहा वर्षे बालकांना देखील अंगणवाडीत पोषण आहार न देता घरपोच वाटप करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद ठेवत सेविका, मदतनीस यांच्या मार्फत यंदा देखील कोरोना काळात घरपोच पोषण आहार वाटप करण्यात येत असल्याची माहिती  महाराष्ट्र 24न्यूज ला  बोलतानी वाघ यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने