लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्या प्रकरणी वनरक्षकावर गुन्हा दाखल
हिंगोली- लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्या प्रकरणी
वनरक्षकावर( ता.२०) रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील लोहगाव येथील आंध आदिवासी तरुणीसी २०१७ पासून वनरक्षक हनुमान गारोळे हा कर्मचारी मोबाईल वर बोलूनप्रेम संबंध ठेवले होते.
वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून २०२० पर्यंत जबरदस्तीने अत्याचार केल्याची फिर्याद पीडित ग्रस्त तरुणीच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात आज दिल्याने आरोपी वनरक्षक हनुमान गारोळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अद्याप आरोपी सध्या फरार आहे
पुढील तपास
ठाणेदार बळीराम बंदखडके
यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक कांबळे ह्या करीत आहेत.
إرسال تعليق