*हिंगोलीत मोकाट फिरणाऱ्याची केली धरपकड पाच जण पॉझिटिव्ह*
हिंगोली प्रतिनिधी
24 एप्रिल 2021
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या आदेशाने आज सकाळी दहा वाजता
अकोला बाय पास परिसरामध्ये सहायक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके यांच्या पथकाने
मोकाट फिरणाऱ्या 104 नागरिकांची
कोरोना चाचणी करून घेतली
त्यापैकी पाच नागरिकांना कोरोणाची लागण झाल्याचे दिसून आले
उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे
आयपीएस अधिकारी येतीस देशमुख
सहायक पोलीस निरीक्षक
बळीराम बंदखडके
पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे
यांच्यासह सरपंच उपसरपंच यांनी पथकाला सहकार्य केले
तर
त्या पाच कोरोना ग्रस्तांना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बंदखडके यांनी दिली आहे
नागरिकांना आव्हान विनाकारण रस्त्यावर फिरू नका उद्या दुपारी एक वाजल्यापासून एक मी पर्यंत संपूर्ण लॉक डाऊन असल्याचेही त्यांनी सांगितले आहे
إرسال تعليق