हिंगोली जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 81 रुग्ण ; तर 84 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज**· 517 रुग्णांवर उपचार सुरु तर एका रुग्णाचा मृत्यू*

*जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 81 रुग्ण ; तर 84 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज*
*·  517 रुग्णांवर उपचार सुरु तर एका रुग्णाचा मृत्यू*
 
 
हिंगोली,  दि. 23 : जिल्ह्यात 81 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.
            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे सेनगाव परिसर 03 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 28 व्यक्ती, औंढा परिसर 05 व्यक्ती, कळमनुरी परिसर 01 व्यक्ती, सेनगाव परिसर 18 व्यक्ती, वसमत परिसर 26 व्यक्ती असे एकूण 81 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 84 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 183 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 30 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 213 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 
           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 15 हजार 364 रुग्ण झाले असून, त्यापैकी  14 हजार 514 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 517  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 333 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

Post a Comment

أحدث أقدم