कळमनुरी बाळापुर महामार्गाच्या धाब्यावर वेश्या व्यवसाय करणाऱ्या दोन महिला सह 6जनावर गुन्हा दाखल

**कळमनुरी बाळापुर महामार्गालगत धाब्यावर चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा*
( सहायक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या पथकाची कार्यवाही.)

दि.01/02/2021 रोजी  मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कळमनुरी ते बाळापुर जाणाऱ्या महामार्गालगत पार्डी मोड जवळील गजानन चंद्रवंशी यांच्या ढाब्यावर वेश्या व्यवसाय चालू असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्या संदर्भाने पोलीस अधीक्षक श्री एम राकेश कलासागर यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री यतिश देशमुख यांच्या पथकाने मध्यरात्री गजानन चंद्रवंशी यांच्या ढाब्यावर डमी ग्राहक पाठवून वेश्या व्यवसाय चालण्यात संदर्भात खात्री केली असता सदर ढाब्यावर जवळा बाजार येथील दोन महिला व सहा पुरुष मिळून आले. तसेच सदर ठिकाणी सदरच्या महिला देह विक्री करत असल्या बाबत खात्री  झाल्याने सदरच्या ढाब्यावर पोलीस पथकाने छापा मारला असता तेथे देहविक्री  करणाऱ्या दोन महिला मिळून आल्या व इतर सहा ग्राहक मिळून आले. सदर ठिकाणचा पंचनामा करून वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला व ग्राहक यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन कळमनुरी येथे अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम या कायद्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 
                     *सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री एम राकेश कलासागर अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री सतीश देशमुख पोलीस निरीक्षक श्री रणजीत भोईटे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री शिवसांब घेवारे, ज्ञानेश्वर मुलगीर, प्रतिभा शेटे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनिता धुळे, संभाजी लेकुळे ,विठ्ठल काळे, किशोर सावंत, ज्ञानेश्वर पायघन, जावेद शेख, संदीप जाधव, शिवाजी पवार, कराळे, दांडेकर यांनी केली आहे

Post a Comment

أحدث أقدم