हिंगोली: ग्रामसंवाद सरपंच संघाची आढावा बैठक हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न

हिंगोली: ग्रामसंवाद सरपंच संघाची आढावा बैठक हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आज दिनांक 29 मे रोजी दुपारी 1 वाजता घेण्यात आली.


या ग्राम संवाद सरपंच संघाचे मराठवाडा विभागीय किरण घोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी , दत्तराव लोंढे, ग्राभसंवाद सरपंच संघाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष अतुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ग्राम संवाद सरपंचांच्या या बैठकीत हिंगोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यानंतर नुतन पदाधिकारी यांच्या मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र व शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव, हिंगोली, वसमत तालुक्यातील अनेक गावचे सरपंच उपसरपंच उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم