*टोळीने गुन्हे करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना 2 वर्षासाठी जिल्ह्यातुन तडीपार*
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांची कारवाई
जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हिंगोली शहर हद्दीत नागरिकांना गंभीर मारहाण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे टोळीने मिळुन, अश्या एकूण 4 गुन्हेगारांना हिंगोली जिल्ह्यातुन हद्दपार केल्ल्याचे आदेश
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पोलीस स्टेशन हिंगोली शहरला दिलेत आहेत
, हिंगोली शहर पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे,यांनी सादर केल्याप्रमाणे टोळी प्रमुख शेख माजीद शेख इस्माईल वय 26 वर्ष, शेख जावेद शेख इस्माईल वय 30 वर्ष, शेख आमेर शेख युसूफ वय 25 वर्ष, उवेश आयुबखाॅ पठाण वय 21 वर्ष , सर्व रा. रेल्वेस्टेशन रोड तोफखाना हिंगोली,अश्या 4 गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 (1) प्रमाणे हिंगोली जिल्ह्यातुन हद्दपार करण्याची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केली , कारवाई करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेकडून मदत
स्थानिक गुन्हे शाखेचे उदय खंडेराय विलास सोनोने यांनी , आत्तापर्यंत या वर्षात पो.स्टे. वसमत शहर व हट्टा पो.स्टे. हद्दीतील एकूण 16 गुन्हेगारांना हिंगोली जिल्ह्यातुन 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले, तसेच या नंतर सुद्धा हिंगोली जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणार्यांना सुद्धा हिंगोली जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी महाराष्ट्र 24 न्युजला बोलताना सांगितले.
إرسال تعليق