पिंपळदरीच्या अन्नपूर्णाला मिळाले हक्काचे घर रमाई योजनेतून घरकुल मंजूर

औंढा नागनाथ: झोपडीत राहुन आपल्या दोन मतीमंद मुलांचा सांभाळ करणाऱ्या पिंपळदरी येथील अन्नपुर्णा धुळे यांच्या कुटूंबाला रमाई घरकुल योजनेतुन प्रशासनाने घरकुल मंजुर केले आसुन या बाबतचे पत्र आज औंढा पं स गटविकास अधिकारी जगदिश शाहु यांनी पिंपळदरी येथे घरी जाऊन दिले.

अन्नपुर्णा धुळे यांची कैफीयत समाज माध्यमातुन पुढे आल्यानंतर समाजातील अनेक दानशुर मंडळीनी पुढे येत त्यांना आर्थीक मदत केली आहे. औंढा तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांनी धुळे यांच्या परीवारातील तिनही सदस्यांचे निराधार योजनेने अनुदान तात्काळ मंजुर करुन त्यांना आधार दिला आहे.


झोपडीत राहुन जिवन जगणाऱ्या या कुटूंबाची व्यथा जि.प.चे उपमुख्यकार्यकारी आधिकारी धनवंत कुमार माळी यांना समजताच त्यांनी सदर कुटूंबास घरकुल योजनेतुन घर का मिळाले नाही याबाबत पं. स. विस्तार अधिकारी प्रदीप बोंढारे यांच्या मार्फत चौकशी करुन अहवाल देण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानंतर त्याःच्या कागदपत्राची पुर्तता करुन आज विशेष समाज कल्याण अधिकारी शिवानंद मिनगीरे यांनी अन्नपुर्णाबाई धुळे यांना रमाई घरकुल योजनेतुन विशेषबाब म्हणुन घरकुल मंजूर केले आसुन या बाबतचे आदेशाची प्रत आज त्यांना घरपोच देण्यात आली. यावेळी गटविकास अधीकारी जगदीश शाहु, विस्तार अधीकारी प्रदिप बोंढारे, सामाजीक कार्यकर्ते बापुराव घोंगडे, सचीन रीठे, अभियंता कोकडवार चंद्रशेखर उजेडे, मुख्याध्यापक अवसरमले, शे. बाबुभाई, बेबीताई खिल्लारे यांची उपस्थीती होती.

Post a Comment

أحدث أقدم