हिंगोली जिल्हा समाजवादी पक्षाची बैठक संपन्न
-------------------------------------
हिंगोली जिल्हा समाजवादी पक्षाची बैठक दिनांक आठ जुलै रोजी संपन्न झाली असून या बैठकीत हिंगोली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असे ठरविण्यात आले तसेच येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षा च्या वतीने निवडणूक लढवावी जास्तीत जास्त पक्षाचे उमेदवार निवडून आणण्याचा दृढनिश्चय केला. शेतकरी बांधवांना ज्या काही अडचणी येतील त्यांना वेळेअभावी मदतीचा हात देत रहावा. जिल्ह्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असून रास्त धान्यात मोठ्या प्रमाणात घोटाळे वर घोटाळे होत असल्याचे दिसून येते. त्याकरिता हिंगोली जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा पवित्रा घेण्याबाबत ठराव घेण्यात आला. तसेच दिनांक 15 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री आदरणीय वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते विधवा महिलांना शिलाई मशीन वाटप करण्याचा निर्णय झाला. निवडणुकीकरिता पक्ष निरीक्षक नेमण्याचे ठरले असून जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाभर दौरे करण्याचे ठरले यावेळी सूत्रसंचालन पक्षाची जिल्हाप्रमुख महासचिव पठाण इम्रान खान यांनी केले यावेळी जिल्हाध्यक्ष शेख खलील बेलदार सह हाजी शेख शिकूर, पठाण नजीब खान, शेख वाजिद, अफजल मोहम्मद, सय्यद ईमाम, मो. मोबीन, शेख मजहर, हाजी मुखीद, निषाद मुजावर, जगताप मामा, समसुद्दिन चौधरी, शेख शमीम, शेख फारुख, समीर बाबा, संतोष साहु, रवी काळे, शेख खालेद, बेबीताई जाधव, राधाबाई इंगोले, वंदना सुदाम, अलका गायकवाड, संतोषी कैलाश, शीला प्रधान, अनिता गायकवाड, ज्योती शिंदे, सय्यद तय्यब, जमीर खान पठाण, तेजस बाबू, सद्दाम शेख. आभार प्रदर्शन महिला शहराध्यक्ष राधाबाई इंगोले यांनी केले.
إرسال تعليق