हिंगोली शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार: आरोपीला अटक

हिंगोली शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार: आरोपीला अटक 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
15 जुलै 2021
हिंगोली
शहरातील ऐका आरोपीने अल्पवयीन मुलीवर हिंगोली शहरातील हाॅटेल रामाकृष्णा समोरील एनटीसी कार्नर येथील बांधकाम सुरू असलेल्या  ईमारतीत दुसरया मजल्यावर  नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 
    या बाबत अधिक माहिती अशी की,  बुधवार दि. 14 जुलै रोजी दुपारी 3:00 ते 5:00 वाजण्याच्या सुमारास ऐका अल्पवयीन मुलीला व तिच्या मैत्रिणीला तूम्हाला नवीन कपडे देतो व पाचशे रुपये देतो असे आमिष दाखवून दुचाकी वर बसवले. आरोपीने पिडीत मुलीला खटकाळी बायपास, हणुमानगर, आजम काॅलनी येथे नेऊन घटनास्थळ हाॅटेल रामाकृष्णा समोरील एनटीसी कार्नर येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेले. पिडित मुलीचे केस लूचुन व गालात थापडाने मारीत जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने जबरदस्ती करून अत्याचार केले. यावरून आरोपी विरूध्द कलम 363, 376,377,323,506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी यश यास अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस उपाधिक्षक यतिश देशमुख, हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, पोलिस उपनिरीक्षक कांबळे यांनी भेट देऊन पंचानामा केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील पोलिस तपास हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती आर. एस. शहारे करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم