मुंबईत समाजवादी पक्षाची बैठक संपन्न
हिंगोली जिल्ह्यातील नगरपालिका लढवणार
आमदार अबू आजमी
महाराष्ट्र 24 न्यूज
17जुलै2021
हिंगोली जिल्हा समाजवादी पक्षाची बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार अबु असीम आजमी यांच्या नेतृत्वात संपन्न झाली
या बैठकीत विविध प्रश्नांवर आणि तसेच येणार्या नगर पंचायत आणि नगर पालिका निवडणूका लढविण्या बाबत विशेष चर्चा झाली असून या बैठकीत प्रदेश महासचिव जुल्फिकार आजमी हिंगोली जिल्हा अध्यक्ष शेख खलील बेलदार हे उपस्थित होते.
यांचा सत्कार करताना जिल्हाध्यक्ष
खलील
बेलदार यांच्या पक्षाचे कार्यकर्ते
या बैठकीत 15 ऑगस्ट 2021 रोजी स्वातंत्र्यदिना निमित्त, हिंगोली जिल्हा समाजवादी पक्षाच्या वतीने स्व.मौलाना नाजीर अहमद खान यांच्या स्मरणार्थ शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्हा पालक मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते शिलाई मशीन वाटपाचे कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात प्रदेश महासचिव जुल्फिकार आजमी यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच यावेळी हिंगोली जिल्ह्यात नगरपालिका निवडणुका आणि औंढा येथील नगरपंचायत निवडणुका लढविण्याचे निश्चित झाले आहे
. यावेळी जिल्हाध्यक्ष शेख खलील बेलदार सह जिल्हाप्रमुख महासचिव पठाण इम्रान खान, जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग पठाण नजीब खान, हिंगोली तालुका अध्यक्ष मंगेश शेळके, जिल्हा उपाध्यक्ष अफजल चौधरी, जिल्हाध्यक्ष युवा जनसभा शेख वाजिद, प्रमुख महासचिव युवा जनसभा ताज मोहम्मद, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग सय्यद अजमत, जिल्हाप्रमुख महासचिव अल्पसंख्यांक विभाग शेख इम्तियाज, जिल्हाप्रमुख महासचिव अल्पसंख्यांक विभाग शेख खाजा, कार्यकारी सदस्य शेख फारुख, वसमत तालुका अध्यक्ष मोहम्मद मुबिन, वसमत शहराध्यक्ष शेख मजहर, वसमत शहर उपाध्यक्ष सय्यद तय्यब, वसमत शहर सचिव शेख सद्दाम, कार्यकारी सदस्य वसमत शेख जावेद हे सर्व तालुका व शहर अध्यक्ष तथा पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालन मंगेश भगवानराव शेळके यांनी केले.
إرسال تعليق