हिंगोली शहरात मित्रानेच केला धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला
सुधाकर वाढवे
महाराष्ट्र 24 न्यूज
12 जुलै 2021
आज हिंगोली शहरात सायंकाळच्या सुमारास अचानक आंबेडकर पुतळा परिसरात जवळ
हिंगोली शहरातील एका मित्राने आपल्या जवळच्या मित्रा च्या पाठीवर खंजीर खुपसून गंभीर दुखापत केल्याची घटना शहरात आज सायंकाळी
घडली आहे
या घटनेमुळे शहरात
तणावाचे वातावरण दिसून आले
घटनास्थळी हिंगोली शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार पंडित कचवे यांच्या पथकासह मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त पाचारण करण्यात आला आहे
दररोज मित्रासोबत राहणाऱ्या
जवळच्या मित्रानेच अचानक पाठीवर खंजीर खुपसला व शहरांमध्ये एकच खळबळ माजली आहे
ग्रामीण भागातून शहरात खरेदी करण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांची झाली पळापळ
दरम्यान पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या पथकाने तात्काळ
त्या जखमी रुग्णाला जीव वाचवण्यासाठी
सामान्य रुग्णालय मध्ये
दाखल करण्यात आले
जखमी झालेला पुरुष
गंभीर असल्याने त्याला तात्काळ नांदेड येथे पुढील उपचारासाठी हरवल्याची माहिती डॉक्टर कडून सांगण्यात आली आहे
ही घटना दारू पिण्याच्या कारणावरून झाल्याची माहिती घटनास्थळ चे नागरिक दबक्या आवाजामध्ये सांगू लागले होते
ही घटना वाऱ्यासारखी पसरताच जिल्हाभरात
चर्चेला उधाणआले आहे
आरोपीचा शोध घेण्यासाठी
दोन पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र 24न्यूज ला बोलताना पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांनी दिली
إرسال تعليق