सोशल मीडियावर बदनामी करणे पडले महागात औंढा पोलिसात दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल

*सोशल मीडियात बदनामी करणे पडले महागात औंढा पोलिसात दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल 

औंढा नागनाथ प्रतिनिधी
12 ऑगस्ट 2021

औंढा नागनाथ सोशल मीडिया सध्या मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे त्याचे अनेक फायदे आहेत तर काही ठिकाणी गैरवापर करून नुसकान होताना पण दिसुन येत आहे याचाच प्रत्यय औंढा शहरात आला असून सोशल मीडिया गैरवापर प्रकरणे दोघा जनाना महागात पडले आसुन औंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान 9 ऑगस्ट रोजी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख किरण घोंगडे यांनी जवळाबाजार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ होत असलेल्या घाणीमुळे पुतळ्याजवळील देशी दारूचे दुकान हटवण्याच्या मागणीचे निवेदन 9 ऑगस्ट ला तहसीलदार डॉ कृष्णा कानगुले यांना देण्यात आले होते.त्यामुळे येथील देशी दारू दुकानदार आशिष परिहार यांनी काही नागरिकांना सोबत घेऊन किरण घोंगडे यांच्या विरोधात निवेदन देत पुतळ्यापासून देशी दारू दुकान लांब असल्याचे दाखले दिले व दुकान हाटवण्याची आवश्यकता नसुन घोंगडे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा वापर करीत आहेत असे म्हणून टिपणी कलत सोशल मीडिया व्हाट्सअप द्वारे पोस्ट करून बदनामी केली तर प्रमोद कुलदिपके यांनी स्वतःच्या फेसबूक व्हाट्सअप स्टेटस अकाऊंटवरून अभद्र टिपणी करत घोंगडे यांची बदनामी केली त्यावरून 11 ऑगस्ट रोजी किरण घोंगडे यांच्या फिर्यादीवरून आशिष परिहार व प्रमोद कुलदीपके यांच्यावर औंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुवर्णा वाळके या प्रकरणाचा तपास करत असून सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यांचे मात्र हा गुन्हा दाखल झाल्याने चांगलेच धाबे दणाणले आहेत.

Post a Comment

أحدث أقدم