हिंगोलीत नवीन इमारतीचा लोकपर्ण सोहळा ; अधिकारी, कर्मचारी पाठ थोपटून घेण्यात मग्न...!
लोकार्पण सोहळ्यात लाखो रुपयांची उधळपट्टी...!
महारष्ट्र 24न्यूज
13 ऑगस्ट 2021
हिंगोली - प्रतिनिधी/-
मागील दोन वर्षापासून शहरात कोट्यवधी रुपयांची पालिकेच्या वतीने कामे करण्यात आली. शुक्रवारी ( ता.१३) ऑगस्ट रोजी नवीन वास्तू पालिकेच्या ताब्यात देण्यासाठी पालकमंत्र्यांच्या हस्ते पडत असताना अधिकारी, कर्मचारी यांनी पाठ थोपटून घेतल्याचे या सोहळ्यात दिसून आले. तर कोरोनाच्या काळात लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा पालिकेकडून करण्यात आला.
येथील नगर पालिकेच्या वतीने शुक्रवारी विशेष वैशिष्टय पूर्ण योजनेतून २३ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बांधकाम इमारतीचे लोकार्पण सोहळा करण्यात आला. यामध्ये नूतन नगर पालिका दुमजली इमारत, स्व. खासदार शिवाजीराव देशमुख सभागृह ,औंढा नागनाथ रस्त्यावरील नाट्यगृह इमारत ,व कयाधु नदी तीरावरील स्मशानभूमीत उभारण्यात आलेल्या वास्तूचे दोन वेळा लोकार्पण सोहळ्याची चर्चा होऊन राजकारण आड आल्याने रद्द करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी अचानक दि.१३ ऑगस्ट निश्चित करून या सोहळयासाठी पालिकेकडून निमंत्रण पत्रिका छापण्यात आली. त्या पत्रिकेवरील माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, चंद्रकांत नवघरे, जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे, आ.सतीश चव्हाण, आ. विप्लव बजोरिया , माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आमदार गजानन घुगे यान बड्या नेत्यांनी या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाला पाठ फिरविली.
आमदार मुटकुळे यांनी पाणी चोर व बोगस रोड संदर्भात पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली कारवाईची मागणी
वेळेवर निमंत्रण दिले असल्याने अनेक जण गैरहजर होते. त्यामुळे सजवून ठेवलेल्या खुरच्याही रिकाम्या होत्या. एनवेळेला नगरपालिकेच्या सफाई कामगार यांना बोलावून त्या खुर्च्यांवर बसविण्यात आले असे चित्र कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी पाहवयास मिळाला. नियोजित कार्यक्रम दुपारी बारा वाजता चालू होणारा पालिकेच्या गोंधळामुळे एक तासाने उशिराने सुरू करण्यात आला. त्यातही अनेकांचे सत्कार करण्यात एक तास लागल्याने अनेकजण ताटकळत बसले होते.
सूत्रसंचालन करणारे पंडित मस्के यांना आपल्या मुख्याधिकारी डॉ. अजय कुरुवाडे यांचे नाव सत्कार घेण्यासाठी सोडून दुसऱ्याचेच नाव घेतल्यानंतर काही वेळाने माफी मागून मुख्याधिकारी यांचा सत्कार केला. त्यानंतर भाषण बाजी सुरू झाली तेंव्हा नागरिकांतून गोंधळ निर्माण झाला आणि व्यासपीठाकडे स्वस्त धान्य दुकानदाराने जनावरांनाही खान्या सारखे नसलेले गहू लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले होते. तोच पुरावा घेऊन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे थेट शांता बाई मोरे यांनी गाऱ्हाणे मांडण्यासाठी प्रयत्न केला असता दमदाटी करण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांनी सगळ्यांना झुगारून अखेर पालकमंत्र्याजवळ पोहचल्या अन आपले गाऱ्हाणे मांडले असता यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधीताविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
पालिकेच्या नूतन इमारतीमधील फर्निचर, खुर्च्या ,कोणतेही काम झाले नाही यासाठी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री यांच्याकडे केली आहे. काम अपुरे असतानाच लोकार्पण सोहळा उरकण्यात घाई का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
------------------------
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची श्यक्यता राज्य सरकारने वर्तवले असल्याने तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी उपाययोजना नगर पालिकेकडून करण्यात येत असल्या तरी या लोकार्पण सोहळ्यात बहुतांश अधिकारी व पदाधिकारी ,यांना मास्क लावण्याचा विसर पडला होता.
إرسال تعليق