एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करा राष्ट्रीय विराट लोकमंचाची राज्यपालाकडे मागणी

एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करा
राष्ट्रीय विराट लोकमंचाची  राज्यपालाकडे मागणी 
 
 वाढत्या महागाईच्या पाश्वभुमीवर केंद्र शासनाव्दारे सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग आणि त्या अनुषंगाने महागाई भत्ता वारंवार वाढवुन दिल्या जात आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाव्दारेसुध्दा राज्यातील विविध विभागांना व अनेक महामंडळाना सातवा वेतन आयोग व महागाई भत्ता मंजुर करण्यात आला असतांना कोरोना काळामध्येही अत्यंत महत्वाची भुमिका बजावणाऱ्या व महाराष्ट्रातील वाहतुकीचा कणा असणाऱ्या एस.टी.महामंडळ मधील कर्मचाऱ्यांना अद्यापही सातवा वेतन आयोग लागु करण्यात आला नाही तरी एस.टी. महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ सातवा वेतन आयोग लागु करुन त्यांच्या ईतरही मागण्या मान्य करणेबाबत.
 
मा.महोदय,
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास सविनय सादर करण्यात येते की, वाढत्या महागाईच्या पाश्वभुमीबर केंद्र शासनाद्वारे सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग आणि त्या अनुषंगाने महागाई भत्ता वारंवार वाढवुन दिल्या जात आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाव्दारेसुध्दा राज्यातील विविध विभागांना व अनेक महामंडळाना सातवा वेतन आयोग व महागाई भत्ता मंजुर करण्यात आलेला आहे.
परंतु महाराष्ट्रामध्ये वाहतुकीचा कणा असणारी आणि दिवसरात्र सेवा देऊन राज्याला आर्थिक प्रगतीकरिता मोलाची भुमीका बजावणारी एस.टी. महामंडळ कर्मचाऱ्यांना अद्यापही सातवा वेतन आयोग लागु करण्यात आला नाही. एस.टी.महामंडळातील कर्मचाऱ्यांनी कोरोना कालावधीमध्येही पार्सल सुविधा, माल वाहतुक सुविधा, वैद्यकीय उपकरणे ब ईतर आवश्यक साहित्य वाहतुकीमध्ये मौलाची भुमीका पार पाडलेली आहे. एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच कोरोना कालावधीतही अनेक वस्तुचा तुटवडा जाणवला नाही. अश्याप्रकारे मौलाची भुमिका बजावणारे एस.टी.कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेमध्ये येत नाहीत असे म्हणुन आजपर्यंत सातवा वेतन आयोग लागु करण्यात आला नाही हि अत्यंत दुखद व अन्यायकारक बाब आहे.
मा. महोदय, एस.टी. विभागातील कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी पगार व पेन्शन मिळत असुन शासनाव्दारे ईतर विभागातील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधापैकी अनेक सुविधा त्यांना देण्यात येत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत असुन आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. तरी आपणास विनंती की, एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ सातवा वेतन आयोग लागु करुन त्यांच्या अनेक वर्षापासुन प्रलंबीत खालील मागण्याही मंजुर करण्यात याव्यात.
1. एस.टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग पुर्वलक्षी प्रभावाने दि.1.1.2016 रोजीपासुन लागु करावा आणि फरकाची रक्‍कम रोखीने किंवा पी.एफ. खात्यामध्ये जमा करण्यात यावी.
2. एस.टी. कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणुन घोषीत करावे.
3. एस.टी. कामगारांच्या पाल्यांना कर्मचारी भरतीमध्ये 15-20% विशेष कोटा व प्राधान्य देण्यात यावे.
4. एस.टी. कर्मचाऱ्यांना प्रामुख्याने चालक वाहक व कार्यशाळा कर्मचारी अपघातामुळे वैद्यकीय अपात्र झालेले आहेत त्यांच्या अबलंबीतास अनुकंपा तत्वावर शैक्षणिक पात्रतेनुसार नौकरीमध्ये सामावुन घेण्यात यावे.
5. एस.टी. कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडीकल सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी.
6. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन व महागाई भत्ता लागु करण्यात यावा आणि फरकाचालाभ रोखीने अदा करण्यात यावा.
7. रात्री उशिरा मुक्कामी पोहोचणाऱ्या गाडीमधील चालक वाहकासाठी विश्रांतीगृह सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. त्याचप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांसाठी वेगळ्या विश्रांतीगृहाची निर्मीती संपुर्ण राज्यभरात करण्यात यावी.
8. राज्यातील अनेक ठिकाणच्या एस.टी. महामंडळ आगाराची दुरावस्था झालेली असुन सदर आगाराचे नुतनीकरण करण्यात यावे.
9. एस.टी. कर्मचाऱ्यांची शासकीय कर्मचारी म्हणुन मान्यता देत खाकी ड्रेस कोड पुन्हा लागु करण्यात यावा.
10. एस.टी. महामंडळाव्दारे बि.ओ.टी. पध्दतीवर घेण्यात येणारे खाजगी बाहने बंद करुन प्रवासाच्या सोईकरिता नवीन CNG बसेस तात्काळ खरेदी करण्यात याव्यात.
11.एस.टी. महामंडळाच्या मालकीच्या गाड्यांच्या दुरुस्तीकरिता लागणारे साहित्य आणि सुविधा ठिकठिकाणी उपलब्ध करुन देण्यात यावे.
12. कंत्राटी पध्दतीवर घेण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना नियमीत करुन घेण्यात यावे.
तरी आदरणीय महोदयानी एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सहानुभुतीपूर्वक विचार विनीमय करुन योग्य ते आदेश व कार्यवाही व्हावी हि विनंती.केली आहे निवेदन देताना 
शेख नईम शेख लाल
संस्थापक अध्यक्ष सह 
सोबत तौफिक अहमद खान,शेख नौमान नवेद नईम,रवि ब.जैस्वाल,शेख नफीस पहेलवान,शेख बासित मेहबूब,शेख अदनान पहेलवान आदी उपस्थित होते

Post a Comment

أحدث أقدم