महिला सुतार समाज मंडळाच्यावतीने हरतालिका कार्यक्रम संपन्न
9 सप्टेंबर 2021
महाराष्ट्र 24 न्यूज
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पुसद येथील सुदामराव कुमकर यांच्या निवासस्थानी शांतीनगर मध्ये9 सप्टेंबर रोजी 2021रोजी हरतालिका महिलांसाठी उत्साहाने कार्यक्रम घेण्यात आला
हरतालिका महत्त्व-
हरतालिका व्रत केल्याने पतीला दीर्घायुष्य लाभतं. असे मानले जाते की हे व्रत केल्याने एखाद्याला योग्य वरही मिळतो. या उपवासाच्या प्रभावाने संतानसुखही मिळतं.
हरतालिका पूजा विधी
या दिवशी वाळूने महादेवाची पिंडी, पार्वती आणि सखीची प्रतिमा तयार केली जाते.
हरतालिका पूजा करण्यापूर्वी गणपतीचे आव्हान केले जातात. विड्यांच्या पानावर खारीक, बदाम, शिक्का ठेवून सुपारीच्या रूपात गणपतीची स्थापना करून त्यांची विधीपूर्वक पूजा केली जाते.
गणपतीला अभिषेक करून, जानवं, शेंदूर, लाल फुलं, दूर्वा, नैवेद्य अर्पित केलं जातं.
नंतर वाळू निर्मित प्रतिमेवर महादेवाला स्नान करवून त्यांना बेलपत्र, शमीपत्र आणि फुलं अर्पित केलं जातात.
या दिवशी महादेवाला विविध पत्री अर्पित करण्याचे अत्यंत महत्त्व आहे.
दरम्यान कोरोणाचे संकट पाहता सर्व महिलांनी सोशल डिस्टिक ठेवून हा कार्यक्रम मोठ्या उल्हासाने पार पडला आहे
महादेवांची विधीपूर्वक पूजन केल्यानंतर देवी पार्वती आणि सखीची पूजा केली जाते. त्यांना शृंगारांच्या वस्तू अर्पित केल्या जातात.
नंतर नैवेद्य दाखवून व्रताचे समापन करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला
पुसद येथील सुदामराव कुमकर यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम घेण्यात आला
महाराष्ट्र सुतार समाज मंडळाच्या निर्मला कुमकर
अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी नगरातील
शितल राठोड विद्या कुमकर शितल कुमकर
सहभाग घेतला होता
إرسال تعليق