हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाची समाजाने जाणीव ठेवावी - खासदार हेमंत पाटील

हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाची समाजाने  जाणीव ठेवावी - खासदार हेमंत पाटील
महाराष्ट्र 24न्यूज 
हिमायतनगर /नांदेड : ज्या शूरवीरांनी  स्वत:च्या कुटूंबाची काळजी न करता देशसेवेसाठी स्वत:ला वाहुन घेऊन प्राणाची आहुती दिली. त्यांच्या विचारांची, कार्याची , बलिदानाची जाणीव समाजाने कायम ठेवावी असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी हिमायतनगर येथे आयोजित  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अभिवादन  कार्यक्रमात केले.  यावेळी खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्ययोध्दा "वीर हुतात्मा जयवंतराव पाटील वायपनेकर" यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे  अनावरण करण्यात आले . 
मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो.   मराठवाड्यात ठिकठिकाणी  वीरांना अभिवादन केले जाते.  खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिमायतनगर येथे आयोजित कार्यक्रमात हुतात्म्यांना अभिवादन केले.  यावेळी  त्यांच्या हस्ते स्वातंत्र्ययोध्दा "वीर हुतात्मा जयवंतराव पाटील वायपनेकर" यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे  अनावरण करण्यात आले.  येथील मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या  संकूलात आयोजित कार्यक्रमास माजी गृहराज्यमंत्री माधवराव  किन्हाळकर , हदगावचे आ. माधवराव पाटील जवळगावकर , माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील, गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील , जेष्ठ संचालक राम भारती,  गणपत भारती, अरुण कुलकर्णी, प्रा. अरुणाताई कुलकर्णी, प्राचार्या उज्ज्वला सदावर्ते, गजानन रणखांब, उपप्राचार्य एल. टी. डाके, तहसीलदार डी.एन.गायकवाड , पोलीस निरीक्षक भगवान कांबळे,  शिवसेना हिमायतनगर तालुका प्रमुख राम ठाकरे, काँग्रेस हिमायतनगर तालुका प्रमुख विकास पाटील देवसरकर, भाजप हिमायतनगर तालुका प्रमुख आशिष सकवान, भाजप युवा जिल्हा प्रमुख राम सूर्यवंशी, जि.प.सदस्य सुभाष आत्मा राठोड , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सकसे , महावीर शेठ श्रीश्रीमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. 
            यावेळी बोलतांना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, स्वातंत्र्य लढा हा पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी असतो त्यामुळे आपण स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक आणि वीर हुतात्म्यांचे स्मरण करून आपल्या येणाऱ्या पिढीला त्याची जाणीव करून द्यायची असते. त्यांना आपला इतिहास सांगितला पाहिजे. तो पुढे रुजवत नेला पाहिजे हीच आपली संस्कृती आहे . आज या ठिकाणी वीर योध्याच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण माझ्या हस्ते  होत आहे ही माझ्यासाठी खूप  अभिमानाची  बाब असून हे  भाग्य मला लाभले  याबद्दल मी सदैव कृतज्ञ राहीन . वीर हुतात्म्यांचे स्मरण म्हणून किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे भव्यदिव्य स्मारक उभारण्याचे  आश्वासन खासदार हेमंत पाटील यांनी दिले.  कार्यक्रमाला परिसरातील जेष्ठ नागरिक यांच्यासह ग्रामस्थाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم