खासदार हेमंत पाटील आपल्या वेतनातून काढणार हिंगोली लोकसभा मतदारसंघातील दिव्यांगाचा विमा

*खासदार हेमंत पाटील आपल्या वेतनातून काढणार  हिंगोली लोकसभा मतदारसंघातील दिव्यांगाचा विमा

हिंगोली  : समाजातील वंचित घटकांसाठी कार्य केल्यास खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा घडते त्यामुळेच   हिंगोली लोकसभा मतदारसंघातील कोणताही दिव्यांग बांधव  शासनाच्या कोणत्याही  योजनेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेऊन मला मिळणारे  खासदारकीचे   वेतन मी  हिंगोली लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांचा विमा काढण्यासाठी देत असल्याची घोषणा खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली येथील कल्याण मंडपममध्ये झालेल्या दिव्यांग साहित्य वाटप शिबिरात केली.  याची संपूर्ण जबाबदारी समाजकल्याण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. 
             या कार्यक्रमाला हिंगोली,नांदेड,बीड चे शिवसेना संपर्क प्रमुख आनंदराव जाधव , जि. प.अध्यक्ष गणाजी बेले ,आ.तानाजी मुटकुळे, परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष राजेशभैया पाटील गोरेगावकर, गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील,शिवसेना जिल्हा समन्वयक दिलीप बांगर, सहसंपर्क प्रमुख डॉ.रमेश शिंदे उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.    *याकार्यक्रमाचे नियोजन, भोजन व्यवस्था व साहित्य वाटपासाठी केलेले नियोजन पाहून दिव्यांग बांधव भारावून गेले तर साहित्य मिळाल्या नंतर दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरचा आंनद मोलाचा होता.*
             खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून गतवर्षी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात  आली होती. *यामध्ये 3 हजारच्या वर लाभार्थी साहित्यासाठी पात्र आहेत त्यांना 2 कोटी 77 लक्ष रुपयाचे साहित्य वाटप करण्यात आले.* त्या अनुषंगाने  दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाचा  कार्यक्रम  हिंगोली, वसमत  आणि सेनगाव येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी हिंगोली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रमुख अतिथी संपर्क प्रमुख आनंदराव जाधव म्हणाले की, मतदारसंघातील जनतेसाठी सातत्याने कार्य करण्याची उर्मी खासदार हेमंत पाटील यांच्या मनात आहे, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आवाका मोठा असताना सुद्धा संपूर्ण मतदारसंघावर आपली मजबूत पकड खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या कार्यातून ठेवली आहे.विकासकामासोबतच समाजातील तळागाळातील सर्वसामान्यासाठी कार्य करण्याची  जाणीव सातत्याने त्यांच्या मनात आहे ते खऱ्या अर्थाने गोर गरीब जनतेचे अश्रू पुसण्याचे काम सामाजिक उपक्रमातून करत आहेत.
         यावेळी खासदार हेमंत पाटील बोलताना म्हणाले की,दिव्यांग बांधवांचा विमा काढण्यासाठी मला मिळणारे   खासदरकीचे  वेतन देत असून यामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व दिव्यांगाचा विमा काढून घेण्याची जबाबदारी  समाजकल्याण विभागावर सोपवत आहे.सोबतच आपणा सर्वांची ही सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे की दिव्यांग बांधवांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणे, निसर्गाने जरी त्यांना जन्मताच कमतरता दिली असली तरी समाजाने त्यांना भेदभावाची वागणूक देऊ नये त्यांना सन्मान द्यावा.मला सांगताना आनंद होतो की, देशातील पहिले दिव्यांग पूणर्वसन केंद्र हिंगोली मध्ये होत आहे आणि यापुढील काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त साहित्य वाटप केले जाईल त्यासाठी नाव नोंदणी करण्यात येत असून दिव्यांगाना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासकीय यंत्रणेने कार्यतत्पर राहून  काम करावे असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले.यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी आणि राजश्री पाटील यांनी दिव्यांग बांधवांची मायेने विचारपूस करून संवाद साधला.
            हिंगोली येथे आयोजित  कार्यक्रमाला व्यासपीठावर पंचायत समिती सभापती संजीवनी दिपके, जि. प.सदस्य प्रकाश थोरात, बाळासाहेब मगर, मंगलाताई कांबळे, शिवसेना हिंगोली तालुका प्रमुख भानुदास जाधव, आनंदराव जगताप, माजी प.स.सदस्य पुंजाजी मुळे, जेष्ठ शिवसैनिक यादवराव घुगे, के.के.शिंदे, नांदेड जि. प.सदस्य बबन बारसे,नांदेड शिवसेना शहरप्रमुख सचिन किसवे, केंद्र सरकारच्या एल्मिको उपक्रमाचे कमलेशकुमार यादव, सृजन भालेराव, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे विष्णू वैरागड, शिवाजी गावंडे, डॉ.अनिल देवसरकर, हिंगोली समाज कल्याण आणि  पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी यांच्यासह दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم