आ. मुटकुळेंच्या हस्ते कोथळज रोड च्या पुलाचे भूमिपूजन संपन्न
शेख खलील बेलदार यांच्या प्रयत्नांना यश
हिंगोली शहरालगत असलेल्या कोथळज रोड शिवाजी महाविद्यालयाच्या बाजूला आजम कॉलनी भागातील नाल्याच्या पुलाचे भूमिपूजन आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले असून रु.66लाख रुपये किंमतीच्या या पुलाचे काम लवकरच सुरु होणार आहे.
यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे यांचा परिसरातील नागरिकांनी शाल हार व चांदीचा रथ देऊन नागरी सत्कार केला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार रामरावजी वडकुते हे होते, या कार्यक्रमाला नगराध्यक्ष बाबुरावजी बांगर, कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संतोष टारफे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुगे, नगरसेवक बिरजूभैय्या यादव, नगरसेवक उमेश गुठ्ठे, काँग्रेसचे नेते विशाल भाऊ घुगे, महिला आघाडीच्या यशोदा ताई कोरडे, रजनीताई पाटील, के के शिंदे, हमीद भाई प्यारेवाले, भाजपाचे नेते गोल्डी, गोवर्धन अण्णा वीरकुंवर, या पुलाचे गुत्तेदार घुले, अभियंता दिलीप पाईकराव, हे उपस्थित होते कार्यक्रमास सर्व मान्यवरांचे सत्कार व व नंतर भाषणे झाली विशेष नागरी सत्कार म्हणून आमदार तानाजीराव मुटकुळे यांना चांदीचा रथ घेऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता पठाण नजिब खान, जगताप मामा,वाजिद शेख, पठाण इम्रान खान, शेख रिजवान, शेख रमीज, अफजल चौधरी, समसुद्दिन चौधरी, शेख खाजा, पठाण जमीर खान, ढेंबरे जी, शेख जमीर, शेख रहीम, शेख नवाज, शेख एजाज, शेख कदीर, शेख अय्याज, सूत्रसंचालन बेलदार यांनी केले तर आभार प्रदर्शन पठाण इम्रान खान यांनी केले.
إرسال تعليق