हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी चोरट्या पासून दक्ष राहावे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर

हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी चोरट्या पासून दक्ष राहावे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर 

महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात तिरची तामिळनाडू येथून पैशाची बॅग चोरनारे टोळ्या आलेले आहेत.  बऱ्याच ठिकाणी गुन्हे पण झाले आहेत. कारचे काच फोडून, बाजूला पैसे फेकून, कार समोर ऑइल टाकून आणि व्यक्तीला किंवा वाहनाला घाण लावून पैशाची बॅग घेऊन जाणाऱ्या माणसांचे लक्ष विचलित करुन बॅग पळवितात. तसेच सदरची चोरटे हे एखाद्या माणसाने बँकेमधून पैसे काढल्यानंतर त्याचा कितीतरी अंतर अनेक किलोमीटर नकळत पाठलाग करतात व संधी मिळताच बॅग घेऊन पळून जातात. तरी आपल्यावर कोणीही लक्ष ठेवत तर नाही ना   किंवा पाठलाग करीत नाही याची खबरदारी घ्यावी व मोठी रक्कम बँकेत भरताना किंवा काढताना  शक्यतो सोबती घेऊन जावे.
तसेच दिवाळी सणानिमित्त बरेच जण आपल्या मूळ गावी किंवा पाहुण्यांकडे किंवा फिरायला बाहेरगावी जातात याची संधी साधून चोरटे बंद घर असलेले पाहून चोऱ्या करतात, त्यामुळे आपले घरातील दागदागिने सुरक्षित रित्या ठेवावे किंवा बँक लॉकर्स मध्ये ठेवावे. तसेच बाहेर गावी जाताना शेजारी यांना आपल्या घरावर सतत लक्ष ठेवण्यासाठी सांगावे.               तसेच अलीकडे मोटारसायकली चोरण्याचे प्रमाण वाढले असून आपली मोटार सायकल व्यवस्थित लॉक करून बाजारामध्ये उभी करीत असताना शक्यतो दुकाना समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेमध्ये मध्ये उभी करावी. तसेच बाजारामध्ये जाताना आपला पॉकेट किंवा मोबाईल मागच्या खिशात ठेवता समोरच्या खिशामध्ये ठेवावे.  प्रवासादरम्यान महिलांनी बसमध्ये चढताना आणि उतरताना आपल्या अंगावरील दागदागिन्याची काळजी घ्यावी. शेजारी अनोळखी बाई जाणून-बुजून धक्का देण्याचा तर प्रयत्न करत नाही ना याची दक्षता घ्यावी.  मदतीसाठी 112 किंवा पोलीस नियंत्रण कक्ष हिंगोली येथे संपर्क करावा.  संपर्क नंबर 8669900676. सर्वांनी सतर्क राहावे. असे आवाहन  पोलीस अधीक्षक  राकेश कलासागर यांनी केली आहे 

Post a Comment

أحدث أقدم