अवैध धंद्ये बंद करण्या संदर्भात आमदार मुटकुळे यांचे उपोषण

अवैध धंद्ये बंद करण्या संदर्भात आमदार मुटकुळे 
यांचे उपोषण  

हिंगोली,  :  प्रतिनिधी 
 जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करण्या संदर्भात आमदार तान्हाजी मुटकुळे  यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते तसेच भाजपचे पदाधिकारी गुरुवारी ता. १८ जिल्हाधिकारी कार्यालया समोर सकाळी 12 वाजता उपोषणास सुरुवात केली  आहे  
 हिंगोली जिल्ह्यात होणारे अवैध धंदे यात रेती,गुटखा, ऑनलाईन मटका, क्लब, दारू या सर्व अवैध धंद्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरू  केले  आहे.
आमदार बोलताना सांगितले की जिल्ह्यातील 13 ही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन समोर लवकरच 
आंदोलन करू असे सांगितले 

ज्या ठिकाणी पोलिस कारवाई करतात त्या  ठिकाणी थेट मुख्यमंत्र्यांचा फोन द्वारे 
कारवाई फेल  जाते 
 काँग्रेसचे माजी आमदार संतोष टारफे यांचा  उपोषणाला पाठिंबा 

उपोषणा ठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त 

 या उपोषणास आमदार  तान्हाजी मुटकुळे साहेब, भारतीय जनता पार्टी चे  जिल्हाध्यक्ष  तथा माजी आमदार  रामराव वडकुते , माजी आमदार  गजानन  घुगे,   नगराध्यक्ष बाबाराव बांगर, लोकसभा संघटक  विनायक भिसे पाटील, पप्पु  चव्हाण, मिलिंद यंबल,  तालुका अध्यक्ष  संतोष  टेकाळे यांच्या सह  भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे मोठ्या संख्येन महिला  सुद्धा उपस्थित होत्या

Post a Comment

أحدث أقدم