शेकडो प्रसूती करणाऱ्या ज्योती परीचारिकेचा स्वतःच्या प्रसूती दरम्यान जीव गमावला

शेकडो  प्रसूती करणाऱ्या परीचारिकेचा स्वतःच्या प्रसूती दरम्यान जीव गमावला 


हिंगोली : हिंगोली मध्ये शेकडो स्त्रियांची यशस्वी प्रसूती करणाऱ्या हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील परीचारिकेला प्रसूती दरम्यान मृत्यूने कवटाळले असल्याची दुःखद घटना घडली आहे. 
ज्योती गवळी असे या मयत परीचारिकेचे नाव आहे.

मागील अनेक  वर्षा पासून त्या हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रसूती कक्षात कर्तव्य बजावत होत्या. दोन नोव्हेंबर रोजी, जिल्हा रुग्णालयात त्यांना नातेवाईकांनी प्रसूती साठी भरती केले. त्यांच्या वर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. या दरम्यान ज्योती यांनी सुदृढ बालकाला जन्म दिला.होता 

दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. शांत संयमी असलेल्या या परिचारिकेच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नांदेड येथे एका खाजगी हॉस्पिटलमध्ये  ज्योतीला उपचारासाठी भरती करण्यात आले होते दरम्यान ज्योतीच्या शरीरातून 
रक्तस्त्राव झाल्याने ज्योती चा मृत्यू झाल्याची माहिती एका डॉक्टरने सांगितले आहे

Post a Comment

أحدث أقدم