माहेरी गेलेल्या पत्नीची नांदायला येण्यास नकार, हातास झालेल्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

माहेरी गेलेल्या पत्नीची नांदायला येण्यास नकार, हातास झालेल्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील शेतकरी कुटुंबात असलेले मंगेश परशुराम खंदारे वय २३ वर्ष या तरुणाने स्वताच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगेश यांचा मृतदेह स्वतःच्या शेतातील एकाच लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. हा सर्व प्रकार आज उघडकीस झाल्यानंतर गावकरी व कुटुंबांनी शेताकडे धाव घेतली, व नंतर मंगेश यांची ओळख पटली. मंगेश यांच्या विवाह झालेला असुन पत्नी नांदायला येत नसल्यामुळे मंगेश हा मागील काही दिवसापासून नैरशा मध्ये होता, शेवटी हताश झालेल्या मंगेश खंदारे यांनी स्वताच्या शेतामध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन मंगेश चा मृतदेह खाली उतरवला सध्या या प्रकरणी हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे. याप्ररणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

Post a Comment

أحدث أقدم