सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतुन समतामुलक समाजनिर्मित झाली पाहिजे- प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे
हिंगोली (प्रतिनिधी)- येथे बौद्ध सांस्कृतीक मंडळातर्फे आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र्रीय व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प दि.१८ जानेवारी रोजी पार पडले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यान मालेचे दुसरे पुष्प अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम.एम.लोकडे, प्रा.डॉ.शत्रुघ्न जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास भुजंगळे, प्रा.डॉ.सुखदेव बलखंडे, प्रा.डॉ.सचिन हाटकर यांची उपस्थिती होती.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला दुसरे पुष्प गुफण्यासाठी आलेल्या व्याख्याते प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांचा परिचर बबन दांडेकर यांनी सांगितला. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना प्रसिद्ध विचारवंत व्याख्याते प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी (आंबेडकरी चळवळीची दिशा आणि दशा) या विषयावर विचार मांडताना. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे समतामुलक समाजनिर्मितीचे जे स्वप्न होते त्यामधुन माणसाच्या जगण्याला नैतिकतेचे अधिष्ठान असले पाहिजे. स्वहिताची भावना जोपासण्यापेक्षा लोकांच्या हीताचा कल्याणकारी विचार राज्यकर्त्यांनी जोपासला पाहिजे. भारतीय राज्यघटनेतुन प्रस्थापित केलेली समता, न्याय, बंधुत्व या मुल्यांसोबत मानवता रुजवता आली पाहिजे. यासाठी राज्यकर्त्यांना निवडुन दिल्यानंतर समतामुलक मुल्यांची रुजवणुक करण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची व्यवस्था केलेली असावी.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समतामुलक समाजनिर्मिती ज्या चळवळी चालविल्या जात आहेत त्या चळवळी अखंडपणे कार्यरत असाव्यात. भारतीय संविधानात अभिप्रेत असलेला भारत राज्यकर्त्यांच्या माध्यमातुन एकसंघतेने निर्माण झाला पाहिजे. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी दिशाहिन होण्यापेक्षा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारित व कृतीशील चळवळीच्या दिशेकडे निष्ठेने चालविता आल्या पाहिजेत, असे परखड विचार प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी माडंले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय ऑनलाईन व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प पार पाडण्यासाठी तंत्रसहाय्य म्हणुन बालाजी जबडे व प्रविण रुईकर यांनी काम पाहिले. दुसर्या पुष्पाचे सुत्रसंचलन भिमराव तुरुकमाने यांनी केले. तर आभार रामा वाकळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बबन दांडेकर, रमेश खंदारे, गंगाधर पाईकराव, अंतिदास इंगोले, विजय कवाने, प्रा.डॉ.कृष्णा इंगळे, प्रा.डॉ.बाबासाहेब साळवे, प्रा.सुनिल कांबळे, विनोद सरोदे, विश्वनाथ लोणकर, बी.बी.भगत यांनी परिश्रम घेतले.
महाराष्ट्र24न्यूज ही वृत्तमालिका विविध प्रकारच्या बातम्या देते. त्याच बरोबर वैचारिक,सांस्कृतिक क्षेत्रातील घडामोडी सुद्धा योग्यप्रकारे टीपण्याचे काम करते.यासाठी मुख्य संपादक व आमचे आंबेडकरी चळवळीतील मित्र सुधाकर वाढवे यांचे मी बौद्ध सांस्कृतिक मंडळ,हिंगोली तर्फे मी अभिनंदन करतो.डॉ.शत्रुघ्न जाधव.
ردحذفإرسال تعليق