खंडणी मागून बदनामी करणाऱ्या वाशीम येथील दोघांना चार दिवसाची पोलीस कोठडी



खंडणी उकळणाऱ्या दोघास बासंबा ठाण्याच्या पथकाने घेतले ताब्यात ; आरोपींना चार दिवसाची पोलिस कोठडी ; सहायक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख  पथकाची कारवाई; मोठे रॅकेट सापडण्याची शक्यता 

हिंगोली - 
 शहरातील एका तरुणास अश्लील व्हिडीओ काढून तुझी सोशल माध्यमातुन बदनामी करण्याची धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या दोघांना बासंबा पथकाने शनिवारी ताब्यात घेत ग्रामीण पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख यांनी नियुक्त केलेल्या विशेष पथकाने केली आहे. या महाठग आरोपी कडून अनेकांना गंडा घातला असल्याची माहिती सुत्रांनी दिली असून मोठे रॅकेट सापडण्याची शक्यता आहे. 
आरोपीकडून शस्त्र  जप्त  करताना पोलिस कर्मचारी 
 संगणमत करून संतोष आचम रा. बळसोंड यांच्याकडून वेळोवेळी रक्कम घेतली. पैसे न दिल्यास तुझे एका महिलेसोबत असलेले अश्लील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी संतोष आचम यांना आरोपी देत होते. या आरोपींनी संतोष आचम यांच्याकडून  वेळोवेळी पैशाची मागणी करत एकूण ११ लाख ६४ हजार रुपये घेतल्याचे ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. परंतु आरोपींच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर संतोष आचम यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी माळहिवरा येथील हनुमान मंदिर परिसरात कारवाई करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी कारवाई करून आरोपीकडील रोकड व शस्त्र जप्त केले आहेत. याप्रकरणी संतोष आचम यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी राहुल सुरेश कांबळे रा. वाशीम पंचशील नगर, तसेच आकाश उर्फ गणेश त्र्यंबक जिरवणकर या दोघा जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही आरोपी संतोष आचम यांना मोबाईलवरून संपर्क करून पैशाची मागणी करत असत. तसेच अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत असत. या आरोपींनी संगणमत करून संतोष आचम यांच्याकडून टप्प्याटप्प्याने जवळपास ११ लाख ६४ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीच्या अटकासाठी बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भोसले,  सहायक पोलिस उपनिरीक्षक मगन पवार, पोलिस कर्मचारी गजानन कराळे, काकडे यांनी यशस्वी कामगिरी करून आरोपींना रंगेहात पकडले. सदर घटनेचा पुढील तपास हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस करत आहेत.


Post a Comment

أحدث أقدم