पुसेगावात तलवार बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा



तलवार बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा

हिंगोली, : 
तालुक्यातील नर्सी नामदेव येथे एकाने वीस इंच लांबीची लोखंडी तलवार जवळ बाळगल्या प्रकरणी एका विरुद्ध नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात शनिवारी (ता.२९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नर्सी नामदेव येथील शाहरुख खान ऊर्फ गुफरान इनायतखान पठाण रा. पुसेगाव याने विनापरवाना बेकायदेशीर रित्या वीस इंच लांबीची लोखंडी तलवार जवळ बाळगल्या प्रकरणी  पोलीस उपनिरीक्षक अशोक कांबळे यांनी शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरून नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Post a Comment

أحدث أقدم