सर्वात आधी स्पष्ट बातमी म्हणजे हिंदूसम्राट न्यूज नेटवर्क ....*
*दुर्गसावंगी येथील १४ वर्षीय मुलीचा शोध घेण्यात बासंबा पोलीसांना यश*
प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली - दुर्गसावंगी येथील १४ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
अवघ्या १० दिवसात मुलीचा शोध लावण्यात बासंबा पोलीसांना यश.
दि. १ जाने.२२रोजी मुलीच्या वडिलांनी बांसबा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती, १४ वर्षाच्या माझ्या मुलीला, आरोपी नामे वैभव सुधाकर मलगुंडे रा. दुर्गसावंगी यांनी फूस लावून दिनांक ३१\१२ २०२१ रोजी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास दुर्गसावंगी येथून मुलीला घेऊन गेला अशी फिर्याद दिली होती फिर्यादीवरून पोलीस स्टेशन बासंबा येथे दि.01 जाने 2022 रोजी गुरन 01/2022 कलम 363 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर पीडित अल्पवयीन मुलगी हिच्या जीविताची काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने शोध लागणे अत्यंत आवश्यक होते. म्हणून पोलीस स्टेशन बासंबा येथील पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस हवालदार नानाराव पोले, पोलीस शिपाई अशोक काकडे, मपोना सारिका राठोड, सायबर क्राईम पोलीस शिपाई सुमित टाले यांनी तपासाचे चक्रे फिरवत आधुनिक तंत्राचा वापर करून अतिशय गोपनीय पद्धतीने जलद गतीने तपास करून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेलेल्या आरोपीस व पीडित मुलीस दि.10 जाने 2022 रोजी बावधन परिसरातून पुणे येथून ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन बासंबा हिंगोली येथे आणले आहे. सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्था मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.
إرسال تعليق