धक्कादायक तपासणीसाठी आलेल्या महिलेचा डॉकटर कडून विनयभंग डॉक्टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

धक्कादायक  तपासणीसाठी आलेल्या महिलेचा डॉकटर कडून विनयभंग 
डॉक्टर पोलिसांच्या जाळ्यात 

दरम्यान या महिलेच्या तक्रारीवरून औंढा पोलिसांनी शासकीय डॉकटर असलेल्या गणेश बड्रेवार विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तातडीने या डॉक्टरला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे.


हिंगोली - जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे. हिंगोलीच्या औंढा शहरातील ग्रामीण रुग्णालयात चक्क एका डॉक्टरने (Doctor) तपासणीसाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी 26 वर्षीय पीडित महिलेने औंढा पोलीस  स्थानकात तक्रार दिली आहे, पोलिसांना दिलेल्या तक्रारी नुसार ही महिला औंढा येथील रुग्णालयात तपासणी साठी गेली होती. या वेळी कर्तव्यावर उपस्थित असलेले डॉकटर गणेश बड्रेवार यांनी या महिलेची तपासणी करताना तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा आरोप महिलेने केला आहे.


दरम्यान या महिलेच्या तक्रारीवरून औंढा पोलिसांनी शासकीय डॉकटर असलेल्या गणेश बड्रेवार विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तातडीने या डॉक्टरला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे. लवकरच पोलीस या डॉक्टरला अटक देखील करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी दिली आहे. दरम्यान या घटनेने हिंगोलीच्या आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली असून, रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Post a Comment

أحدث أقدم