डॉ. वसंतराव देशमुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ; अत्यसंस्कारला मोठा जनसमुदाय उपस्थित

डॉ. वसंतराव देशमुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार ; अत्यसंस्कारला मोठा जनसमुदाय उपस्थित 

हिंगोली -- नेहमी कामात अग्रेसर असणारे डॉ. वसंतराव देशमुख त्यांचे मृत्यू समयी ६३वर्ष वय होते.त्यांचे  (दि.७ )जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास हिंगोली येथे त्यांच्या निवस्थानी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.  शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी  नांदापूर येथील मूळगावी हजारोचा जनसागर लोटल्याचे दिसून आले.

कळमनुरी विधानसभेतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले  जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती डॉ. वसंतराव देशमुख यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर झळकताच अनेकांचे अश्रू अनावर झाले होते. त्यांच्या  पश्चात भाऊ डाॅ. श्री. साहेबराव देशमुख, पत्नी हिंगोली जि.प.च्या माजी सदस्या शोभाताई वसंतराव देशमुख, पुतने डाॅ. श्री. जयदीप देशमुख,  अखिल भारतीय मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष  भुषण देशमुख, मुलगी सौ. रूपालीताई हरीश्चद्रराव शिंदे, मुले श्री. अमोल, श्री. स्वप्नील, श्री. वैभव यांच्यासह सुन, नातवंड असा मोठा परिवार आहे. स्व. डाॅ. श्री. वसंतराव देशमुख यांच्यावर राहते गांव नांदापुर येथे शनिवार दि. ८ जानेवारी रोजी दुपारी १:00 वाजता अत्यसंस्कार करण्यात आले.

 डाॅ. श्री. वसंतराव देशमुख नांदापूरकर यांनी तब्बल चार दशक सामाजिक व राजकीय क्षेत्रात जनसामान्यांशी अतिशय जवळून नाळ ठेवून माणसं जोडली. एक आधुनिक शेतकरी ते तत्वनिष्ठ सुसंस्कृत जनसामान्याचा आधार असलेलं व्यक्तीमत्व म्हणून त्यांना संपूर्ण जिल्हा ओळखतो. राजकारणाची सुरूवात म्हणून त्यांनी तब्बल विस वर्ष नांदापूर गावाची सरपंच पदाची धुरा सांभाळली. गावातील सेवा सहकारी सोसायटीचे ते दहा वर्ष आजतागायत चेअरमन होते. दहा वर्ष हिंगोली जिल्हा परिषदेचे सदस्या समवेत जि. प. चे शिक्षण व अर्थ समिती सभापती पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळून हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात महत्वपूर्ण योगदान दिले. आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक होते. 

   स्व. श्री. वसंतराव  यांनी तत्वनिष्ठ, शब्द पाळणारा, रूबाबदार भारदस्त, सुसंस्कृत राजकीय व्यक्तीमत्व होतं. जनसामान्यांशी अतिशय जवळून नात जोपून हजारो लोकांना त्यांनी जोडले होते. गोरगरीब, वंचित घटकांसाठी त्यांनी सदैव तळमळीने काम केले. नांदापूर  गावी त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेऊन रूग्नसेवा केली. हिंगोली जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती असतांना हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात ग्रामीण भागातील शैक्षणीक कार्य पध्दती व गुणवत्ता वाढ यासाठी सातत्याने प्रयत्न करून महत्वाचे बदल केले. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ते नंतर आता भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष त्यांनी पक्षीय जबाबदारी सांभाळली. आपुलकीने माणसं जोडल्यामुळे त्यांचे सर्वच पक्षाच्या लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. आधुनिक शेतकरी ते तत्वनिष्ठ सुसंस्कृत राजकारणी, लोकप्रिय जनसामान्यांचा नेता हरवला आहे. त्यांचे अचानक जाणे सामाजिक व राजकीय पटलावर  मोठे नुकसान झाले असून सुसंस्कृत व्यक्तीमत्व आपल्यातून गेल्याचे तिव्र दुख वेदनादायी आहे. 

यावेळी माजी मंत्री गणेशराव दुधगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार प्रज्ञा सातव, आमदार संतोष बांगर, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, डॉ. संतोष टारफे, रामराव वडकुते, जीप पदाधिकारी, सदस्य, पंचायत समिती सदस्य, अधिकारी, डॉक्टर, शेतकरी, यांच्यासह हजारोचा जनसमुदाय उपस्थित होता. डाॅ. स्व. वसंतराव देशमुख यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.

Post a Comment

أحدث أقدم