हिंगोली: हिंगोलीमध्ये (Hingoli) राज्य राखीव पोलिस (Police) दलाच्या जवानाने गळफास घेऊनk आत्महत्या (self-slaughter) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनेश बाळासाहेब मुलगीर असे आत्महत्या केलेल्या जवानाचे (Jawan) नाव असून, ते हिंगोलीच्या (Hingoli) राज्य राखीव पोलीस दलातील बल गट क्रमांक 12 येथे कार्यरत होते. सध्या दिनेश हे गडचिरोली जिल्ह्यातील राजाराम खंडाला विभागामध्ये कर्तव्यावर होते.
दरम्यान दिनेश हे पाच दिवसांच्या सुटीवर गावी (village) आले होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणी बाळापूर (Balapur) पोलिसात नोंद करण्यात आली असून, या जवानाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
إرسال تعليق