हिंगोलीतील वंदना इंगळे यांना धम्माभूषण पुरस्कार प्रदान

वंदना  इंगळे यांना धम्माभूषण पुरस्कार प्रदान


हिंगोली -  कै. बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. कृष्णा सुदाम इंगळे यांच्या सुविद्य पत्नी  वंदना इंगळे यांना महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती शाखा वटफळी तालुका नेर जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने दिला जाणारा बुद्ध धम्मातील प्रतिष्ठेचा धर्मभूषण पुरस्कार ३ फेब्रुवारी  रोजी  पूजनीय भन्ते प्राध्यापक भदंत सुमेध बोधी महाथेरो यांच्या शुभहस्ते वटकळी येथे प्रदान करण्यात आला.

 या कार्यक्रमास  भिकू आचार्य एच धम्मदीप फेरो , भिकू नाग दोष,  भिकू एस. राहुल,  भिकू संग बोधी, आर्या जी रूप नंदा आदींची उपस्थिती होती. वंदना इंगळे यांनी बुद्ध धम्मात उल्लेखनीय कार्य केल्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.   आईच्या समाज कार्याचा वसा घेऊन त्यांनी समाजकार्य चालू ठेवले आहे. त्यांचा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم