आरोग्य तपासणी शिबिरात १५५ कर्मचार्यांनी केली तपासणी
हिंगोली,- नगर पालिका हिंगोलीच्या वतीने सोमवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १५५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सोमवारी सकाळी ११ वाजता आरोग्य शिबीराचे आयोजन हिंगोली नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले होते.
नगरपालिकेच्या सफाई कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, कचरा वेचक, सार्वजनिक शौचालय येथील नियुक्त महिला व पुरुष कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, मुंजाजी बांगर, विजय शिखरे, अमरसिंग ठाकूर, तसेच आरोग्य विभागातील डॉ. नंदनी भगत, संतोष खडसे, शुभम पाटील, गजानन शिंदे, आदी उपस्थित होते. यावेळी आरोग्य शिबिरात १५५ सफाई कर्मचारी यांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली.
إرسال تعليق