दिल्लीकरांचे चुकीने बँक खात्यावर आलेले एक लाख रुपये हिंगोलीकरांनी केले परत.

*दिल्लीकरांचे चुकीने बँक खात्यावर आलेले एक लाख रुपये हिंगोलीकरांनी केले परत.*

दिनांक 10/03/ 2022 रोजी दिल्लीतील राहुल गौर यांचे पैसे कॅनरा बँकेत आपल्या मित्राच्या अकाउंट वर ट्रान्सफर करताना अकाउंट नंबर मधील एक नंबर चुकल्यामुळे तब्बल एक लाख रुपये हिंगोलीतील पूजा सुशील इंगोले यांच्या कॅनरा बँकेच्या खात्यावर आले. अचानक अकाउंट वर पैसे आल्यामुळे सुशील इंगोले यांनी  कोणत्या तरी शासकीय योजनेचे पैसे आले असतील असे वाटले व आनंद झाला. परंतु सदरचा आनंद हा औटघटकेचा ठरला.  तसेच ज्यांचे पैसे चुकीने ट्रान्सफर झाले होते  त्यां इसमांनी हरियाणा येथील सोनीपत जिल्हा पोलिसांशी संपर्क साधला. सोनीपत जिल्हा पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली चे पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्याशी संपर्क साधला असता पोलीस उपनिरीक्षक घेवारे यांनी  सुशील इंगोले यांना  बोलावून घेऊन विचारपूस केली असता असता सुशील इंगोले यांनी सुद्धा सदर चे पैसे अकाउंट वर आल्याचे प्रामाणिकपणे सांगीतले.  त्यानंतर लगेच  कॅनरा बँकेतील मॅनेजर यांनी सुशील यांच्या सांगण्यावरून सदरचे पैसे हरियाणा येथील राहुल गौर यांना परत केले आहे. याबद्दल हरियाणा पोलिसांनी हिंगोली पोलिसांचे  व  सुशील इंगोले यांचे आभार मानले.                                      एरव्ही गल्लीत राहणाऱ्या  मित्रांचे  उसने घेतलेले पैसे सुद्धा काही लोक देत नाहीत, परंतु सुशील इंगोले यांनी हजारो किलोमीटरवरील अनोळखी माणसाकडून अकाउंट वर आलेले पैसे गुन्हे शाखेच्या सल्ल्याप्रमाणे तात्काळ परत करून एक प्रकारे हिंगोलीकरांचा प्रामाणिकपणा दिल्लीकरांना दाखवून दिलेला आहे.

Post a Comment

أحدث أقدم