हिंगोलीत वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न*

*हिंगोली येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न*

येत्या नगरपालिका निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर दिनांक 15/03/2022 रोजी हिंगोली नगरपालिका निरीक्षक मोबिन चिस्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत व हिंगोली शहर अध्यक्ष अतिखुर रहेमान यांच्या अध्यक्षतखाली शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे बैठक पार पडली....या बैठकीत येत्या नगरपालिका निवडणुकीच्या बाबतीत विविध विषयावर चर्चा केली...यावेळी वार्ड निहाय अध्यक्ष निवड व वार्ड निरीक्षक नेमण्या बाबत सूचना करण्यात आल्या... *वन बूथ टेन युथ ही संकल्पना मांडून नगर पालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडी ताकतीने लढणार असल्याचे शेख अतीखुर रहेमान यांनी सांगितले.* यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव रविंद्र भाऊ वाढे, जिल्हा सचिव ज्योतीपाल रणवीर,जिल्हा संघटक अनिल कांबळे,हिंगोली तालुका अध्यक्ष प्रणव जोंधळे,संतोष घोडेकर महाराज, अन्वरखान पठाण, आनंद खिल्लारे शहरमहासचिव रवी शिखरे, शहर संघटक सुशील भीमा सुर्यतळ  कसबे,शहर सदस्य सचिन वाघमारे,विशाल वाकडे,शेख नशीब,शेख अतिख,साही खान पठाण,शेख अरबाज,इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
 यावेळी शेख रहेमान शेख चांद व स.जाफर स.अजगर यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला.

Post a Comment

أحدث أقدم