बिस्कीट देण्याच्या बहाण्यानं चिमुरडीसोबत लज्जास्पद कृत्य : गुन्हा दाखल...!
हिंगोली/-
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी हिंगोली ग्रामीण पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी कनिष्क कांबेळविरुद्ध पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आठ वर्षांच्या अल्पवयीन चिमुरडीवर बिस्किट देण्याच्या बहाण्यानं राक्षसी कृत्य केलंय. या चिमुरडीचा विनयभंग करण्याऱ्याविरोधात पोलिसांत तक्रारही देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आठ वर्षांची चिमुरडी शौचालयासाठी घराबाबहेर पडली होती. त्यावेळी नराधमानं तिला बिस्किट देण्याचं आमीष दाखवलं. यानंतर या चिमुरडीला पकडून तिची पॅन्ट नराधमानं खाली करुन या मुलीचा विनयभंग केलाय. बराच वेळ घराबाहेर शौचासाठी केलेली मुलगी घरी का परतली नाही, म्हणून तिची आई मुलीला पाहण्यासाठी बाहेर आली. तेव्हा आईला या चिमुरडीच्या रडण्याचा आवाज आला. तेव्हा नराधमानं तिथून पळ काढला. दरम्यान, नंतर हा सगळा प्रकार पोलिसांना कळवण्यात आला आणि याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला.
कनिष्क केदारलिंग कांबळे या नराधमानं चिमुरडीला बिस्किटाचं आमीष दाखवलं होतं. यानंतर तिला पकडून तिची पॅन्ट खाली करुन विनयभंग करण्यात आला. ही चिमुकली बराच वेळ घरी न परतल्यानं तिची आईची चिंतीत झाली. शोचालयासाठी ही मुलगी घराच्या बाहेर पडली होती.
दरम्यान, पीडित मुलीची आई बाहेर आल्यानंतर संशयित आरोपी कनिष्कनं घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी हिंगोली ग्रामीण पोलिसांत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी संशयित आरोपी कनिष्क कांबेळविरुद्ध पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे
إرسال تعليق