अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचा निषेध

अँड.बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचा निषेध


 जिल्हाधिकारी यांना वंचित आघाडीचे  निवेदन


हिंगोली,: येथील वंचित आघाडीच्या वतीने अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्याचा निषेध करत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल यांच्याकडे  शुक्रवारी  निवेदन दिले आहे.

 

याबाबत रविंद्र वाढे, बबन भुक्तर, सुनील इंगोले, ज्योतीपाल रणवीर, प्रणव जोंधळे, आतीकभाई, विशाल इंगोले, रवि शिखरे, रतन लोनकर, लखन खंदारे, राहुल पुंडगे,नितीन खिल्लारे, डॉ. सिध्दार्थ वाघमारे आदींनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जवळा बाजार येथील शिवसंपर्क अभियानाच्या सभेत  आमदार संतोष बांगर यांनी अँड . बाळासाहेब आंबेडकरावर बिनबुडाचे आरोप केले आहेत.  एकेरी भाषेत त्यांचा उल्लेख केला आहे. त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नसतांनी असे बिनबुडाचे आरोप करणारे  आमदार संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करण्यात यावी.  अँड . बाळासाहेब आंबेडकरांना माननाऱ्या सर्व स्तरातील लोकांकडून आम्ही निषेध करत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم