कळमनुरी स्पंदनास्पूर्ती फायनान्स वसुली अधिकारी निघाला चोर आरोपी कडून 14 लाख 92 हजाराचा मुद्देमाल जप्त

स्पंदनास्फुर्ती फायनान्स लिमीटेड, शाखा कळमनुरी कार्यालयात घडलेल्या  घटनेतील आरोपी स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली कडुन जेरबंद (आरोपी कडुन रोख रक्कम, मोबाईल व कार जप्त)

दिनांक ११.०४.२०२२ रोजी कळमनुरी शहरातील स्पंदनास्फुर्ती फायनान्स लिमीटेड, शाखा कळमनुरी विकासनगर, कळमनुरी कार्यालयाचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून कार्यालयातुन रोख रक्कम ९,३९,०००/ रुपये असलेली तिजोरी व ०६ मोबाईल चोरून मेले म्हणून पो.स्टे. कळमनुरी येथे गुन्हा   दाखल
करण्यात आला  होता.  गुन्हयासंदर्भाने मा.पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी घटनास्थळास भेट देवून पो. नि. उदय खंडेराय यांनी  गुन्ह्यातील  योग्य सुचना देवुन सदरचा गुन्हा उघड करणेबाबत पथक तयार करून रवाना करणेबाय आदेशीत केले होते. त्यावरून पोलीस निरीक्षक उदय खंडेराया  यांनी त्यांचे अधिपत्याखाली स्था.गु.शाचे विशेष पथक तयार केले. सदर पथकापडुन  गुन्हयासंदर्भाने आरोपी व गुन्हयातील   माहिती घेत असतांन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनिय माहिती मिळाल्यावरून रिसोड, अगरवाडी येथे जादुन आरोपी नाम १) बाळू पिता पंढरीनाथ घुगे, वय २३ वर्ष, व्यवसाय खाजगी नौकरी, रा. शिवडी, ता. जिंतुर, जि. परभणी ह.मु अगरवाडी, ता. रिसोड, जि.वाशिम यास ताब्यात घेवून गुन्हवासंदर्भाने विचारपुस केली असता त्याने कबुली दिली की, मी स्पंदनास्फुर्ती फायनान्स लिमीटेड, शाखा कळमनुरी कार्यालयात वसुली अधिकारी म्हणून काम करता असून, मला कार्यालयातील व इतर बाबींची परिपूर्ण माहिती होती. आरोपी बाळू घुगे याने त्याचे मित्र २) अविनाश उर्फ पांडु पिता दादाराव तनपुरे, वय २१ वर्ष, व्यवसाय शेती, ३) सचिन पिता हिमतराव वायभासे, वय २० वर्ष, व्यवसाय शेती, ४) पवन पिता सोपान बोडखे, वय २१ वर्ष, व्यवसाय शेती, अ.क. २ ते ४ रा. मौजे आमवाडी, ना. रिसोड, जि.वाशिम यांना लॉकरमध्ये भरपुर रूपये असतात व आपण चोरी केली तर आपणाला भरपुर रुपये मिळतील, कार्यालयात चोरी कशी करायची याबाबत त्यांना समजावुन सांगुन त्यांनी चोरी करण्याची योजना आखली व त्यांनी पवन सोपान बोडखे हा बालवीत असलेली स्वीफ्ट डिझायर कार क एम. एच. ३५ वी. करून कार्यालयाचे कुलुप टॉमीने तोडुन कार्यालयातील ९,३९,०००/- रुपयांचे लॉकर कारमध्ये टाकुन कार्यालयातील ०६ मोबाईलसह चोरून नेले. त्यानुषंगाने पो. नि. उदय खंडेराय यांचे पथकाने विशेष कौशल्य वापरून आरोपीकडुन रोख ७,७२,००० रक्कम व गुन्हयात वापरलेली कार क्र. एम. एच. ३५५५२२ व २०,००० रूचे गुन्हयात वापरलेले मोबाईल असा एकुण १४.९२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री एम. राकेश कलासागर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सहायक पोलीस अधीक्षक श्री यतिश देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री उदय खंडेराय , पोलीस पोलीस उप निरीक्षक भाग्यश्री कांबळे पोलीस अमलदार बालाजी बोके,   शेख शकील, किशोर, राजु ठाकुर, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, ज्ञानेश्वर सावळे, विठ्ठल काळे  सुमीत टाले, प्रमोद थोरात 
हे कारवाईत सहभागी झाले होते

Post a Comment

أحدث أقدم