उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या पथकाची वाळु माफियावर कारवाईरेती तस्करांचे धाबे दणानले

उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या पथकाची वाळु माफियावर कारवाई
रेती  तस्करांचे धाबे दणानले 

हिंगोली (प्रतिनिधी)- येथील उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्याकडे वसमत येथील उपविभागीय अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार घेताच अवैध वाहतुक करणार्‍या वाळु माफियावर कारवाई करीत ३ हयवा टिपर पकडून औंढा नागनाथ पोलिसात जप्त करुन १२ लाखाचा दंड ठोठावला आहे.  
सोमवार दि.१८ एप्रिल रोजी सकाळी ५.३० वाजता औंढा नागनाथ तालुक्यातील वाहु घाटावरुन बेकायदेशीररित्या वाळु उपसा करुन त्याची वाहतुक केली जात होती. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी वाळु उपसा करुन पहाटे पाच वाजल्यापासुनच वाळुची वाहतुक केली जात होती. त्यामुळे मोठया प्रमाणावर प्रशासनाचा महसुल बुडत होता. यासंदर्भात प्रशासनाकडे अनेक तक्रारी देखली प्राप्त झाल्या होत्या. त्यावरुन माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, महसुलचे कर्मचारी महेश गळाकातु, गजानन रणखांब, बद्री वाबळे, विजय सोमटकर, पंजाब होडबे, राम रोडगे, सहायक पथक भास्कर पांडे, रवि इंगोले, गणेश शिंदे, सुनिल मरळे यांच्यासह हिंगोली व सेनगाव तलाठी पथकाने मॉर्निग वॉकच्या बहाना करुन औंढा नागनाथ तालुक्यात जिंतुरकडुन तिन हायवा ट्रक मध्ये वाळु वाहतुक केली जात असल्याचे तपासणी दरम्यान आढळुन आले असता चालकांची विचारपुस केली. चालकाकडे कोणात्याही प्रकारची परवाना नसल्यामुळे तीन्ही वाहने जप्त करुन औंढा नागनाथ पोलिसांत जप्त करण्यात आली. या तिन्ही वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, पोलीस निरीक्षक  वैजनाथ मुंढे यांनी दिली. या तिन्ही वाहन मालकांना एकुण १२ लाख रुपयांची नोटीस पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  

Post a Comment

أحدث أقدم