पोत्रा येथील कबड्डी स्पर्धेत इसापुर तांडा संघाने मारली बाजी



पोत्रा येथील कबड्डी स्पर्धेत इसापुर तांडा संघाने मारली बाजी

 हिंगोली जिल्ह्यातील 
पोत्रा येथील पवित्रेश्वर महादेव यात्रेत आयोजित कबड्डी स्पर्धेत श्री सेवा संघ ईसापुर तांडा येथील संघाने प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली आहे.
पोत्रा या ठिकाणी शुक्रवारी रात्री कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कबड्डी स्पर्धांचे उदघाटन माजी.जि.प.सदस्य तथा शेतकरी नेते अजित मगर, शिवसेनेचे राजेंद्र शिखरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विधान परिषदेच्या आ.डॉ.प्रज्ञाताई राजीव सातव यांनी पवित्रेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन कबड्डी संघास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. शुक्रवारी रात्रभर कबड्डी स्पर्धां संपन्न झाल्या. यावेळी २३ संघानी आपला सहभाग नोंदवला होता. यावेळी कळमनुरी तालुक्यातील श्री सेवा संघ ईसापुर तांडा येथील संघाने ११ हजार रूपयाचे प्रथम पारितोषिक पटकावले, द्वितीय पारितोषिक जय हनुमान संघ चिंचाळा यांनी , तृतीय पारितोषक जय बिरसा संघ बोल्डावाडी, चतुर्थ पारितोषक बहिर्जी स्मारक संघ वसमत यांनी पटकावले, पंच म्हणून बबनराव बोथीकर, आंनद माहोरे यांनी काम पाहिले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने