आगामी सण उत्सव शांततेत साजरे करा अन्यथा कायदा मोडणार्‍यांवर कठोर कार्यवाहीराकेश कलासागर



आगामी सण उत्सव शांततेत साजरे करा अन्यथा कायदा मोडणार्‍यांवर कठोर कार्यवाही

राकेश कलासागर 

हिंगोली 
रमजान ईद व अक्षय तृतीया हा सण व उत्सव दि.३ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. हा सण उत्सव साजरा करताना एकमेकांच्या धर्माचा आदर करुन एकमेकांना शुभेच्छा सण आनंदाने साजरा करावा, अन्यथा कायदा मोडणार्‍यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी आवाहन करण्यात आले आहे. 
मुस्लिम धर्मियांतर्फे रमजान ईद व हिंदु धर्मियांतर्फे अक्षय तृतीया हा सण व उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सदर सण उत्सव साजरा करताना कोणत्याही समाजाला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच धार्मिक स्थळांवर व धार्मिक कार्यक्रमाचे ठिकाणी लावण्यात आलेले लाऊड स्पीकर, भोंगे संबंधाने पो.स्टे.कडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित पो.स्टे.ला अर्ज देवुन विहित नमुन्यातील परवानगी हस्तगत करुन कार्यक्रमाच्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी लाऊड स्पीकर, भोंगे लावण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अटी व नियमांचे तंतोतंत पालन करावे, परवानगी नसलेल्या धार्मिक स्थळावर लाऊस स्पीकर, भोंगे लावल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. कोणत्याही ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवु नये यासाठी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने प्रत्येक चौकात पोलिसांचे फिक्स पॉईंट व पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. तसेच काही पोलिस कर्मचारी साध्या वेषात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असुन पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी केले आहे. 


Post a Comment

أحدث أقدم