शिवसेनेने हिंदुत्व सोडल्यानेच भाजपात परतलो-माजी खा.शिवाजी माने
हिंगोली
शिवसेना मूळ विचारधारेपासून हिंदुत्वापासून दूर गेल्यानेच भाजप मध्ये पुन्हा परतल्याचे माजी खासदार शिवाजी माने यांनी सांगितले.
येथील भाजपा जिल्हा कार्यालयात बुधवार दि.२७ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, आ.तान्हाजी मुटकुळे, माजी आ.गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, दिनकर देशमुख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण आदींची उपस्थिती होती.
शिवाजी माने बोलताना पुढे म्हणाले, पूर्वी मी भाजप मध्ये होतो. मात्र ऐन निवडणुकीच्या वेळी भाजप शिवसेनेची युती असल्यानेच सेनेत प्रवेश घेतला. मात्र शिवसेना मूळ विचारधारेपासून दूर गेली असुन ध्येय, धोरणे विसरुन लोकांचे प्रश्न सोडविण्या ऐवजी मुलांच्या हातात दगड देऊन, भिरकविण्यास सांगितले जात असल्याचा टोला लगावला. पुढे ते म्हणाले, कॉंग्रेस, राष्ट्रवादी हे तर आमचे पारंपरिक विरोधी पक्ष असल्याचे सांगून शिवसेना भाजपला युती मुळे जनतेने निवडून दिले. परंतु बहुमत असताना शिवसेनेने महाविकास आघाडी सोबत घरोबा करून सत्ता मिळविली असल्याने भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. त्यामुळे शिवसेना मूळ विचारधारेपासून दूर गेल्याने मला पुन्हा भाजपात परतण्याची वेळ आली आहे. आता आमचा शिवसेना सोबतच प्रखर लढाई असल्याचे सांगून येणार्या निवडणुकीत शेतकर्यांचे प्रश्न, पाणी, वीज यासाठी जिल्हाभरात भाजप लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी खा. ऍड.शिवाजी माने यांनी भाजपात प्रवेश केल्याने मात्र भाजपची ताकद वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
माजी खा.शिवाजी माने यांचा औंढयात सत्कार
औंढा नागनाथ माजी खा.ऍड.शिवाजी माने यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे बुधवारी औंढा नागनाथ येथील शासकीय विश्रामगृह येथे त्यांचा औंढा तालुका भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, मिलिंद यंबल, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुजितसिंह ठाकूर, युवा तालुकाध्यक्ष मंचकराव कदम, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष माऊली कदम, तालुकाध्यक्ष सखाराम इंगळे, बालाजी वानखेडे, माऊली कदम, विलास काळे, ऍड.एस.एस.कदम, सर्जेराव दिंडे, महाजी पावडे, शेषराव उघडे, सिद्धबाराव कर्रे , सुधाकर साळवे, माधव वानखेडे, प्रा.गजानन कुटे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
إرسال تعليق